spot_img
अहमदनगरAhmednagar: सुप्यात धडकणार भगवे वादळ: सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य तयारी

Ahmednagar: सुप्यात धडकणार भगवे वादळ: सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य तयारी

spot_img

सुपा / शरद रसाळ
सकल मराठा समाजाचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेला २० जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून सुरूवात झाली असून आज सोमवार दि. २२ रोजी ऐतिहासिक पारनेर तालुक्यातील सुपा येथील सरदार श्रीमंत शाबुशिंग पवार मैदानावर हे भगवे वादळ धडकणार आहे.

पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सुमारे १७० एकर क्षेत्रावर मराठी बांधवांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पारनेर सकल मराठा समाजाच्या वतीने लापशी व मसाला भात महाभोजनाचे तर श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने आमदार राहुल जगताप यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सुमारे ५ ते ६ मराठा बांधव सहभागी होतील असा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज बांधवांचे २० जानेवारी पासुन जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथुन पदयात्रेने मुंबईला जाण्यासाठी प्रस्थान झाले आहे. या पदयात्रेत लाखो मराठा बांधव सहभागी झाले असुन ही पदयात्रा अंतरवली सराटी शाहागड, गेवराई, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, अहमदनगर, केडगाव, सुपा, शिरुर, वाघोली, शिवाजी नगर, पुणे, मुंबई एक्सप्रेस हायवे, लोणावळा, पनवेल, मुंबई अशा मार्गाने जाणार आहे. याचे नियोजन पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

नगर- पुणे महामार्गावरील सुपा परिसरात या मोर्चाचे आज दुपार चे भोजन होणार आहे. मोर्चे करांच्या अन्न, पाणी, व इतर सोयीसुविधांची तयारी पूर्ण झाली असून रस्त्याच्या दुतर्फा पाणी टँकर उभे करणे, जेवणाची पाकीटे भरुन ती विभागून वाटप करणे, त्यांना बसण्यासाठी जागा स्वच्छ करणे, जास्तीत जास्त स्वयंसेवक महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्त करणे, मोर्चात महिला मोर्चेकरी असल्याने आपल्या परिसरातील महीला स्वयंसेवक तयार ठेवणे, मोर्चाचे स्वागत, जेवण, पाणी आदी गोष्टीं सह मोर्चा शिरुर पुणे जिल्ह्यातील हद्दीत सुरक्षित पोहोच होईल आदीचे नियोजन करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...

ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करणाऱ्या कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांच्या कार्याचे अनुकरण करण्याची गरज : मंत्री विखे पाटील

निघोज / नगर सह्याद्री ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करीत कन्हैया दूध उद्योग समूहाच्या माध्यमातून...

डॉ. अनिल बोरगे यांचे आयुक्तांना पत्र, म्हणाले चुकीचा अर्थ लावून…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महानगरपालिका स्तरावर...

पाणी आणणे म्हणजे एमआयडीसीत ठेकेदारी करणे नव्हे; मंत्री विखेंचा खा. लंकेंना सूचक टोला

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खा. लंकेंना टोला | कान्हूर पठार येथे मंत्री विखेंचा...