spot_img
अहमदनगरAhmednagar Today News: बहिणीच्या घरी भावानेच टाकला डाका!! टप्यात येताच 'एलसीबी 'ने...

Ahmednagar Today News: बहिणीच्या घरी भावानेच टाकला डाका!! टप्यात येताच ‘एलसीबी ‘ने ठोकल्या बेड्या

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
गेल्या काही दिवसापूर्वी नागापूर एमआयडीसी परिसरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. ही घरफोडी भावानेच केल्याचे उघड झाले असून त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १६ लाख १८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सुरज प्रकाश लोढा (वय २९, रा. भूषणनगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १३ लाख २६ हजार ४०० रुपये किमतीचे २२१ ग्रॅम सोन्याचे दागिने, २ लाख ४ हजार ५०० रुपये रोख रक्कम, गुन्ह्यावेळी वापरलेले १६ हजार रुपये किमतीची दोन मोबाईल, ७० हजारांची दुचाकी व तिजोरी कापण्यास वापरलेले ग्राइंडर असा १६ लाख १८ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सुजय सुनील गांधी (रा. जिमखाना एमआयडीसी) यांनी घरफोडी बाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार आहेर यांनी पथक तयार करून घटनेची माहिती गोळा केली. यावेळी त्यांना हा गुन्हा फिर्यादी यांचा मेव्हणा सुरज लोढा याने केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. आरोपी लोढा याने मुथुट फायनान्स कंपनीमध्ये काही सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्याचे कळाले.

त्यानुसार पोलीस पथकाने सुरज लोढा याच्यावर नजर ठेवली. त्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने त्यास त्याब्यात घेतले. त्यानेच घरफोडी केली असल्याचे तपासात पुढे आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि तुुषार धाकराव, संदीप पवार, रवींद्र कर्डिले, भिमराज खर्से, विजय ठोंबरे, सचिन अडबल, संतोष लोढे, संतोष खैरे, रवींद्र घुंगासे, सागर ससाणे, अमृत आढाव, आकाश काळे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, अरुण मोरे यांच्या पथकाने केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...

ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करणाऱ्या कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांच्या कार्याचे अनुकरण करण्याची गरज : मंत्री विखे पाटील

निघोज / नगर सह्याद्री ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करीत कन्हैया दूध उद्योग समूहाच्या माध्यमातून...

डॉ. अनिल बोरगे यांचे आयुक्तांना पत्र, म्हणाले चुकीचा अर्थ लावून…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महानगरपालिका स्तरावर...

पाणी आणणे म्हणजे एमआयडीसीत ठेकेदारी करणे नव्हे; मंत्री विखेंचा खा. लंकेंना सूचक टोला

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खा. लंकेंना टोला | कान्हूर पठार येथे मंत्री विखेंचा...