अहमदनगर। नगर सहयाद्री-
काबाड कष्ट करून शेतकर्यांनी पिकवलेल्या शेतमाल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. या कारवाईत पोलिसांनी सात आरोपी अटक केले असून, ९ लाख २६ हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला आहे.
वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी, अमोल संतोष माळी, (दोघे रा. जामगाव ता. पारनेर), रोहित सुनील शेळके (रा. लोणी हवेली, ता. पारनेर), आकाश अजिनाथ गोलवड, विकास विठ्ठल घावटे, संदीप उत्तम गोरे (तिघे रा. जामगाव, ता. पारनेर), किरण संजय बर्डे, (रा. शिरुर जि. पुणे), साहील नामदेव माळी, (रा. जामगाव ता. पारनेर) असे आरोपींची नावे आहेत.
श्रीगोंदे तालुयातील शेतकर्यांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत ऋषिकेश देविदास लगड (रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा) यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा वैभव औटी याने केला असल्याचे खात्रीशीर समजले. तो जामगाव ते पारनेर रस्त्याने जात असल्याचीही माहिती मिळाली. पो. नि. आहेर यांनी तत्काळ एक पथक रवाना करून जामगाव घाटात सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.
ही कारवाई गुन्हे शाखेतील सफौ. भाऊसाहेब काळे, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, रवींद्र कर्डिले, फुरकान शेख, संतोष खैरे, रणजित जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाणे, मेघराज कोल्हे, अरुण मोरे यांच्या पथकाने केली. पोलिसांनी आरोपींकडून ९६ हजार रुपये किमतीची १२ क्विंटल पांढरी तूर, ३० हजार रुपये किमतीची ६ क्विंटल सोयाबीन, ८ लाख रुपये किमतीचा चार चाकी टेम्पो असा ९ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेतलेल्या आरोपींना बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.