श्रीरामपूर।नगर सहयाद्री-
उद्या गुरुवार दि. ४ जानेवारी रोजी श्रीरामपूर येथील थत्ते मैदान येथे शिडीं लोकसभा मतदारसंघाचेखासदार सदाशिव लोखंडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा निम्मित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती अभीष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने देण्यात आली आहे.
यावेळी प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या कार्यक्रम ठेवण्यात आला असून मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, खासदार श्रीकांत शिंदे माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आ. भानुदास मुरकुटे, आ. आशुतोष काळे, आ. डॉ. किरण लहामटे, आ. सत्यजित तांबे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माजी आ. स्नेहलताताई कोल्हे, माजी आ. चंद्रशेखर कदम, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, माजी आ. नरेंद्र घुले, माजी आ. वैभव पिचड, माजी आ. संभाजीराव फाटके आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री नारी शक्ती योजना नोंदणी शुभारंभ सकाळी ११.४५ वाजता होईल. त्यानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
सायंकाळी ६ ते ७ सत्कार समारंभ होणार आहे. खा. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री वयोश्री योजना व नारीशक्ती योजना शुभारंभ सायं. ७ वाजता होईल.या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.