spot_img
अहमदनगरAhmednagar News Today: बनावट अपंगत्व प्रमाणपत्राचे लागेबांधे जिल्हा रुग्णालयात! पुन्हा घडला 'असा'...

Ahmednagar News Today: बनावट अपंगत्व प्रमाणपत्राचे लागेबांधे जिल्हा रुग्णालयात! पुन्हा घडला ‘असा’ प्रकार, दोघांना बेड्या

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांच्या बनावट अपंगत्व प्रमाणपत्रांचे प्रकरण गाजत असतानाच बुधवारी जिल्हा सरकारी रुग्णालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे व बनावट ओळख सांगून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न उघडकीस आला. जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार टळला.

या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक अर्जुन यादव (रा. निंबारी, बीड) व राहुल संपत आभाळे (रा. मढी खुर्द, कोपरगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात जिल्हा सरकारी रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक दत्तात्रय झुंबर धाडगे यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हा परिषदेतील बदल्यांमध्ये सवलत मिळवण्यासाठी बनावट अपंगत्व प्रमाणपत्र सादर झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुसार अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांची तपासणी पुण्यातील ससून रुग्णालयातमार्फत केली जात आहे.

बनावट अपंगत्व प्रमाणपत्राचे लागेबांधे जिल्हा सरकारी रुग्णालयात असल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातीलच वैद्यकीय अधिकारी डॉ बापूसाहेब गाडे यांच्या सतर्कतेमुळे दोघांचा बनावट अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न फसला. रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी या दोघांना पकडून तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले.

आरोपी अर्जुन यादव व राहुल आभाळे जिल्हा सरकारी रुग्णालयात आले. त्यांनी शुभम सुनील तरटे (रा. गुरव पिंपरी, कर्जत) या नावाने केसपेपर काढला व स्वतः अपंग असल्याची माहिती देत अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून डॉ. गाडे यांच्याकडे आले. डॉ. गाडे यांच्यापुढे अशोक यादव या नावाने आधार कार्ड व कागदपत्रे, फोटो सादर केला. डॉ. गाडे यांनी शुभम तरटे कोठे आहे? अशी विचारणा केली असता उडवा उडवीची दिली. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी अधिक चौकशी केल्यावर अशोक यादव याने, ’आमचे चुकले, आम्ही आता असे करणार नाही.

आम्ही खोटे प्रमाणपत्र काढण्यास आलो होतो’, असे सांगितले. त्यानंतर डॉ. गाडे यांनी कर्मचारी अमृता गवळी, श्रीमती वाघमारे, दत्तात्रय जठाडे यांना बोलावून चौकशी केली. त्यात बनवेगिरी व रुग्णालयाची दिशाभूल करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आला. अशोक यादव व राहुल आभाळे या दोघांना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटात राडा; मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात...

..अन् नायलॉन मांजाने आयुष्याचा दोर कापला, राज्यात ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू

Maharashtra News: मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर...

हवामान विभागाची महत्वाची अपडेट; थंडी गायब? ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Weather Update: राज्यामध्ये थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे...

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...