spot_img
ब्रेकिंग'जरांगे यांचा अजूनही हजारे झाला नाही', 'यांनी' मांडले स्पष्ट मत

‘जरांगे यांचा अजूनही हजारे झाला नाही’, ‘यांनी’ मांडले स्पष्ट मत

spot_img

पुणे । नगर सहयाद्री-
मराठा जातीमध्ये चातुर्वर्ण व्यवस्था सुरू आहे. बहुतांश उद्योगपती आणि राजकारणी असणारे मराठे आजही सामान्य परिस्थितीतील बांधवांना प्रगत समजत नाहीत. त्यांच्या घरातील मुला-मुलींची एकमेकांशी लग्नेही होत नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने उभारलेला लढा अप्रगत मराठा समाजासाठी आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी मराठा आंदोलनाची पाठराखण केली. अण्णा हजारेही एकेकाळी अनघड नेतृत्त्व होते. पण ते राजकारण्यांच्या सहवासात आले आणि पुढे काय झाले, हे आपल्याला माहिती आहे. अजून तरी जरांगे यांचा अण्णा हजारे झालेला नाही,’ असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित २३ व्या साहित्यिक कलावंत संमेलनात ‘आरक्षण आणि महाराष्ट्राचे भवितव्य’ या विषयावरील परिसंवादात अध्यक्षपदावरून डॉ. सप्तर्षी बोलत होते. परिसंवादात आरक्षण विषयाचे अभ्यासक डॉ. बाळासाहेब सराटे, ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने, भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक प्रा. डॉ. अविनाश कोल्हे सहभागी झाले होते.

चारही वक्त्यांनी आरक्षणाचे वेगवेगळे पैलू उपस्थितांसमोर ठेवून मराठा आरक्षणाच्या तिढ्यावर प्रकाश टाकला. मराठ्यांमधील प्रगत समाजाने फडणवीस यांचे नेतृत्त्व मान्य केले आहे. त्यामुळे आरक्षणाविषयी त्यांची भूमिका सरकारच्या बाजूने आहे. पण, हा लढा आता सरकार किंवा मराठा राजकारण्यांच्या हाती उरला नाही. आजवर प्रगत मराठ्यांच्या घरात मोलमजुरी करणार्‍या गरीब समाजाने तो आपला लढा म्हणून हाती घेतला आहे. या दृष्टिकोनातून त्याला महत्त्व आहे,’ असे डॉ. सप्तर्षी म्हणाले.

मराठ्यांना आरक्षण दिले, तर त्यांचे सगळे प्रश्न सुटतील का, असा सवाल विचारत सारंग दर्शने यांनी सरकारी नोकर्‍यांचा मुद्दा अधोरेखित केला. सरकारी नोकर्‍या उपलब्ध नाहीत, हे आता शहरी, ग्रामीण मुलांना कळायला हवे. सरकारने कंत्राटी कामगार भरायला सुरुवात केली आहे. यावरून भविष्यात काहीशे नोकर्‍या उपलब्ध असतील. अशा वेळी केवळ आरक्षणाने प्रश्न सुटणार का, याचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...