मुंबई । नगर सह्याद्री-
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेट काही तासांत संपणार आहे. दरम्यान २४ तासात मराठा आरक्षणासाठी दोन आत्महत्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहे. या घटनेने खळबळ उडाली असून मनोज जरांगे पाटील पुन्हा नव्याने अंदोलनाचे हत्यार उपसणार का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत २४ डिसेंबर पर्यंत आहे. अवघ्या काही तासात दिलेल्या मुदतीचा अल्टीमेट संपणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यात आंदोलन सुरु आहे.
धाराशिव, बीड जिल्ह्यातील आदोलकांनी आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली आहे.धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील २४ वर्षीय अमरनाथ भाऊसाहेब कदम या तरुणाने जीवन यात्रा संपवली असून बीड शहरातील बार्शी नाका परिसरामधील ५० वर्षीय मधुकर शिंगण यांनी आत्महत्या केली आहे.
मराठा समाजाला सरकारने तातडीने आरक्षण जाहीर करावं या मागणीसाठी आज मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा होणार आहे. या सभेसाठी राज्यभरातून मराठा आंदोलक उपस्थित राहणार असून आरक्षणाबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.