spot_img
ब्रेकिंगParner Politics News: रेशनकार्डचे क्रेडीट? भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवाद! 'ते' म्हणाले आमच्या प्रयत्नातून...

Parner Politics News: रेशनकार्डचे क्रेडीट? भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवाद! ‘ते’ म्हणाले आमच्या प्रयत्नातून तर ‘हे’ म्हणतात आम्हीच मिळवले

spot_img

आम्हीच मिळवून दिला लाभ: तालुकाध्यक्ष राहूल पाटील शिंदे

पारनेर | नगर सह्याद्री-राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत करण्यात येणार्‍या मोफत धान्य वितरणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या पारनेर तालुयातील सुपा येथील त्या ९५ लाभार्थ्यांना मोफत धान्याचा लाभ मिळाला आहे. मात्र हा लाभ आम्हीच मिळवून दिला. यावरून भाजप राष्ट्रवादीत जुंपली आहे.

हा दावा आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanka)यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात असतानाच भाजपचे तालुकाध्यक्ष राहूल पाटील शिंदे सुपेचे सरपंच मनिषा योगेश रोकडे, माजी उपसरपंच दत्तात्रय पवार यांनी आम्ही स्वतः हा पुरवठा विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहून हे प्रकरण मंजूर केले असल्याचा दावा केला आहे. यावरून सोशल मीडियावर दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत.

आमदार लंके यांच्या (MLA Nilesh Lanka) प्रयत्नातून लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला असल्याची माहिती माजी सभापती दीपक पवार, उपसरपंच विजय जयवंत पवार, बाजार समितीचे संचालक विजय पवार, ग्रामपंचायत सदस्य विलास वामन पवार यांनी दिली.

सेवा सोसायटी मार्फत चालू असलेल्या मोफत धान्य योजनेमध्ये या लाभार्थ्यांना पूर्वी मोफत धान्य मिळत होते. सुमारे वर्षभरापूवी या लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळेनासे झाले. दोन, तीन चकरा मारूनही प्रतिसाद मिळत नसल्याने या सर्वांनी आमदार नीलेश लंके यांच्याकडे याबाबत तक्रार केली. आ. लंके यांनी यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिका-यांशी पत्रव्यवहार करतानाच प्रत्यक्ष संपर्क करून या लाभार्थ्यांना या योजनेपासून का वंचित ठेवले जात आहे याविषयी विचारणा केली.

हे लाभार्थी या योजनेपासून कोणत्या त्रृटीमुळे वंचित राहिले याचा शोध घेऊन सर्व लाभार्थ्यांना तात्काळ लाभ मिळाला पहिजे अशा सुचना आ.लंके यांनी दिल्या होत्या.दुसरीकडे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या सुचनेनुसार त्या ९५ वंचित लाभार्थ्यांना मोफत धान्याचा लाभ मिळवून दिला असल्याचा दावा भाजप तालुकाध्यक्ष राहूल पाटील शिंदे, सरपंच पती उद्योजक योगेश रोकडे, माजी उपसरपंच दत्तात्रय पवार यांनी केला आहे. उद्योजक योगेश रोकडे यांनी स्वतः हा पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन पाठपुरावा केला असल्याचा फोटो सोशल मीडियावर पाठविला असून आणखी काय पुरावा पाहिजे असा प्रश्न उपस्थित केला आहे.

आ. लंके यांच्या प्रयत्नातून वंचितांना धान्य: दीपक पवार

MLA Nilesh Lanka: राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत करण्यात येणार्‍या मोफत धान्य वितरणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या सुपे येथील ९५ लाभार्थ्यांचा आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanka) यांच्या प्रयत्नातून या योजनेत समावेश करण्यात आल्याची माहिती माजी सभापती दीपक पवार, उपसरपंच विजय जयवंत पवार, बाजार समितीचे संचालक विजय पवार, ग्रामपंचायत सदस्य विलास वामन पवार यांनी दिली.

मोफत धान्य योजनेमध्ये या लाभार्थ्यांना पूर्वी मोफत धान्य मिळत होते. सुमारे वर्षभरापूवी या लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळेनासे झाले. या योजनेपासून वंचित राहिल्याने या लाभार्थ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांनी सामुहीकपणे दीपक पवार, उपसरपंच विजय पवार, बाजार समितीचे संचालक विजय पवार व विलास पवार यांच्याजवळ कैफियत मांडल्यानंतर त्यांनी पारनेर येथील तहसिल कार्यालयाील पुरवठा विभागाशी संपर्क साधला. दोन, तीन चकरा मारूनही प्रतिसाद मिळत नसल्याने या सर्वांनी आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanka) यांच्याकडे याबाबत तक्रार केली. आ. लंके यांनी यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिका-यांशी पत्रव्यवहार करतानाच प्रत्यक्ष संपर्क करून या लाभार्थ्यांना या योजनेपासून का वंचित ठेवले जात आहे याविषयी विचारणा केली.

हे लाभार्थी या योजनेपासून कोणत्या त्रृटीमुळे वंचित राहिले याचा शोध घेऊन सर्व लाभार्थ्यांना तात्काळ लाभ मिळाला पहिजे अशा सुचना आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanka) यांनी दिल्या होत्या. आ. लंके यांच्या सुचनेनुसार या ९५ लाभार्थ्यांचा समावेश ऑनलाईन रेशनकार्डच्या यादीमध्ये समावेश झाला असून त्यांना दरमहा मोफत धान्य योजनेचा लाभ मिळणार आहे. आ. लंके यांनी याप्रकरणी पाठपुरावा करून या योजनेचा लाभ मिळवून दिल्याबददल पदाधिका-यांसह लाभार्थींनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...