spot_img
ब्रेकिंगवारकऱ्यांच्या मदतीला विठ्ठल..! आमदार थोरात यांच्याकडुन जखमी वारकऱ्यांची चौकशी

वारकऱ्यांच्या मदतीला विठ्ठल..! आमदार थोरात यांच्याकडुन जखमी वारकऱ्यांची चौकशी

spot_img

संगमनेर। नगर सहयाद्री-

शिर्डी येथील महंत काशीकानंद महाराज यांची साई पालखी दिंडी आळंदी कडे जात असताना घारगाव जवळ झालेल्या अपघातानंतर मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी तातडीने प्रशासन व पदाधिकाऱ्यांना या वारकऱ्यांना मदतीच्या सूचना देत सर्वांना मदत केल्यानंतर आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी कुटे हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्व जखमी वारकऱ्यांची आस्तेवाईकपणे चौकशी करून सर्वांना दिलासा दिला.

काल शिर्डी येथून आळंदी देवाची येथे काशीका नंदजी महाराज यांची पालखी दिंडी जात होती नांदूर खंदरमाळ फाटा सातवा मैल येथे दुपारी चार वाजता ट्रक दिंडीमध्ये घुसल्याने मोठा अपघात झाला. या अपघाताचे वृत्त समजतात आमदार थोरात यांनी साखर कारखाना, दूध संघ, यांच्यासह यशोधन कार्यालय व विविध पदाधिकाऱ्यांना या वारकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना केल्या. तातडीने सर्व पदाधिकारी यशोधन संपर्क यंत्रणा धावून जाऊन या सर्वांना मदत केली व दिलासा दिला. मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांनाही मदत केली. तातडीने सर्व जखमी वारकऱ्यांना कुटे हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले.

आज आमदार थोरात यांनी या सर्व वारकऱ्यांना भेटून त्यांची चौकशी केली व शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून या वारकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच हॉस्पिटलमध्ये सर्वांना भेटल्यानंतर शिर्डी येथे काशीकानंद महाराज यांच्या आश्रमास भेट देऊन सर्व परिस्थितीची माहिती घेत दिलासा दिला. त्याच बरोबर मृत वारकरी बाळासाहेब गवळी (मढी) बबन पाटीलबा थोरे (शिर्डी) भाऊसाहेब नाथा जपे (कणकुरी ) व ताराबाई गंगाधर गमे (को-हाळे) या चारही वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.

यावेळी आमदार थोरात म्हणाले की, झालेली घटना ही अत्यंत दुःखदायक आहे. हजारो वर्षाची परंपरा असल्या वारकरी संप्रदाय आहे अत्यंत भक्तिभावाने वारकरी विविध दिंड्यांमध्ये सहभागी होत असतात. अत्यंत अकस्मात पणे ही दुर्दैवी घटना घडली आहे. दुखापतग्रस्त वारकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करून मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांना शासन स्तरावरून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याकरता आपण प्रयत्न करू असेही ते म्हणाले त्याचबरोबर या सर्व कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असून लवकरात लवकर सर्व वारकरी बरे होओ अशी प्रार्थना ही त्यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटात राडा; मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात...

..अन् नायलॉन मांजाने आयुष्याचा दोर कापला, राज्यात ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू

Maharashtra News: मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर...

हवामान विभागाची महत्वाची अपडेट; थंडी गायब? ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Weather Update: राज्यामध्ये थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे...

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...