spot_img
ब्रेकिंगमहसूल मंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर! दिले 'हे' महत्वाचे आदेश

महसूल मंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर! दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

spot_img

निघोज। नगर सहयाद्री-

राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील गारपीटग्रस्त भागांची पाहणी करीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून सरसकट पंचनामे करण्याच्या सुचना संबंधीतांना दिल्या असून योग्य ती नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

पारनेर तालुक्यातील निघोज, गांजीभोयरे, सांगवीसुर्या वडुले, राळेगण थेरपाळ तसेच पंधरा ते वीस गावांना वादळीवाऱ्यासह गारांच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्या आहेत. याबाबत यातील काही गावांना नामदार विखे पाटील यांनी भेटी देत परस्थीतीची माहिती करुण घेत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना सुचना दिल्या. यावेळी भाजपचे कार्यकर्ते तसेच शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतीमालाला भाव नाही त्यातच यावर्षी पाउसाचे प्रमाण अत्यल्प आहे. शेतकरी पुर्णपणे हतबल झाला आहे त्यातच रविवारी झालेल्या गारपीट,वादळी वारा तसेच पाउस कांदा उत्पादक शेतकरी, फळबागायतदार तसेच सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला असून सरकारने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी कमीत कमी एक ते सव्वा लाख रुपये नुकसानभरपाई दिली तरच शेतकरी समर्थपणे उभा राहील तसेच बॅंका,सोसायटी पतसंस्था यांच्या वसुली थांबवावी अशी मागणी केली.

यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले, परस्थीती अत्यंत गंभीर आहे याची सरकारला जाणीव आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असून पंचनामा करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही यावेळी नामदार विखे पाटील यांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...