spot_img
ब्रेकिंगआजचे राशी भविष्य! 'या' राशींसाठी सोन्याचे दिवस..

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी सोन्याचे दिवस..

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री –
मेष राशी भविष्य

तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे या समस्येशी दोन हात करू शकेल. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कौटुंबिक प्रश्नांना सर्वात उच्च प्राथमिकता द्यावी. त्यावर विनाविलंब चर्चा करून मार्ग काढणे गरजेचे आहे.

मिथुन राशी भविष्य

कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. ब-याच काळापासून ते वाट पाहात असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला वेळ एकटा घालवू शकतात. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर संशय घेईल. पण दिवसाच्या शेवटी मात्र तो/ती समजून घेईल आणि तुम्हाला मिठीत घेईल.

सिंह राशी भविष्य

आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर, आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. वादविवाद, दुस-यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा.आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. आज नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकेल.

तुळ राशी भविष्य

ठराविक कालाने येणारा मानसिक शाररिक थकवा काही प्रश्न निर्माण करेल. तुमच्या शरीराची प्रक्रीया सुरळीत चालण्यासाठी संपूर्ण विश्रांतीची गरज आहे. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतीत करू शकतात. ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटल ही जावे लागू शकते आणि तुमचे बरेच धन ही खर्च होऊ शकते. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील.

धनु राशी भविष्य

कामातील आपल्या चुका कबूल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण स्वत:ला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. प्रत्येकजण चुका करतो, पण मूर्ख व्यक्ती चुकांची पुनरावृत्ती करतात हे लक्षात ठेवा. रम्य सहली समाधानकारक ठरतील. तुमचे तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल.

कुंभ राशी भविष्य

आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. कमिशन-लाभांश- किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका.

वृषभ राशी भविष्य

मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल – कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. सुयोग्य कर्मचा-यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल.

कर्क राशी भविष्य

तेलकट आणि तिखट आहार टाळा. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्टी आहे ती वापरा. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल.

कन्या राशी भविष्य

तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागेल – जे वचन तुम्ही पूर्ण करू शकणार नाही ते देऊ नका. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला दोघांपासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे. असे करण्याने तुमच्यात सकारात्मक बदल येतील. तुमचा/तुमची जोडीदार आज रोमँटिक मूडमध्ये आहे.

वृश्चिक राशी भविष्य

सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे, धावपळीचे बनेल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल, तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल.

मकर राशी भविष्य

आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढून आपल्या जीवनसाथी सोबत कुठे फिरायला जाऊ शकतात तथापि, या वेळात तुम्हा दोघांच्या मध्ये थोडे-फार वाद होऊ शकतात. तुम्ही आज असं काहीतरी करणार आहात, ज्यानं तुमचा/तुमची जोडीदार खूप एक्साइट होणार आहे.

मीन राशी भविष्य

आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. जर तुम्ही कुणाकडून आपली उधारी माघात असाल आणि तो काही कारणास्तव तुमच्या गोष्टीला टाळत असेल तर, आज तो न बोलता तुम्हाला पैसे परत करेल. तुमच्या घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल. प्रणयराधन करण्याच्या आठवणींनी तुमचा दिवस व्यापून राहील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटात राडा; मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात...

..अन् नायलॉन मांजाने आयुष्याचा दोर कापला, राज्यात ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू

Maharashtra News: मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर...

हवामान विभागाची महत्वाची अपडेट; थंडी गायब? ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Weather Update: राज्यामध्ये थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे...

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...