spot_img
लाईफस्टाईलVatu Tips : 'ही' 5 झाडे असतील तुमच्या घरात तर वाढेल तुमची...

Vatu Tips : ‘ही’ 5 झाडे असतील तुमच्या घरात तर वाढेल तुमची धन-दौलत

spot_img

नगर सहयाद्री : घरात, घरासमोर झाडे लावणे सर्वानाच आवडते. वास्तुशास्त्रानुसार झाडे घरातील वातावरण शुद्ध करतातच शिवाय जीवनात आनंदही आणतात. अशी काही झाडे आहेत जी घरात सुख-समृद्धी आणतात असे मानले जाते. वास्तूनुसार ही झाडे घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा तर मिळतेच शिवाय कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्यास मदत होते. जाणून घ्या कोणती आहेत ही 5 झाडे.

तुळशी : ही वनस्पती सहसा प्रत्येकाच्या घरात आढळते. तुळशीचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे, तसेच ते घरात लावल्याने सुख-समृद्धीही मिळते असे मानले जाते. पण घरात तुळशीचे रोप असेल तर काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याची यथायोग्य पूजा करावी. हे कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये. तीची योग्य जागा पूर्व दिशा किंवा ईशान्य मानली जाते. रविवारी तुळशीला हात लावला जात नाही.

शमी : ही वनस्पती शमी देवाशी संबंधित असल्याचे मानले जाते. हे रोप घराच्या डाव्या बाजूला लावावे. तसेच त्याची योग्य प्रकारे पूजा करावी. असे मानले जाते की या रोपाची लागवड केल्याने घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. वास्तू दोष दूर होतात. यासोबतच शनि ग्रहही मजबूत होतो.

हळद : घरात हे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. ती ठेवण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशा ही उत्तम जागा मानली जाते. दररोज या वनस्पतीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ही वनस्पती घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते.

मनी ट्री किंवा क्रॅसुला : याला जेड प्लांट असेही म्हटले जाते. या झाडाने घरात संपत्ती येते असे मानलं जाते. ते प्रवेशद्वारावर आतील बाजूस लावावे. हे झाड पैसे स्वतःकडे आकर्षित करते अशी मान्यता आहे.

बांबूची रोपे : वास्तूनुसार घरामध्ये बांबूची रोपे लावल्याने सुख-समृद्धी येते. बांबूच्या छोट्या रोपांना लाल धाग्यात बांधून उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवल्यास आर्थिक प्रगती होते. वास्तूनुसार बांबूचे 6 देठ संपत्ती आकर्षित करतात.

टीप : ही माहिती ज्ञानावर आधारित आहे. नगर सह्याद्री याची पुष्टी करत नाही)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...