spot_img
अहमदनगरAhmednagar : अहमदनगरकरांनो ड्रोन कॅमेरा उडवाल तर सावधान ! पहा प्रशासनाने दिलाय...

Ahmednagar : अहमदनगरकरांनो ड्रोन कॅमेरा उडवाल तर सावधान ! पहा प्रशासनाने दिलाय ‘हा’ इशारा

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अहमदनगर दौरा आहे. दौऱ्यांच्या अनुषंगाने अहमदनगर उपविभागातील झापवाडी शिवार, ता. नेवासा, जि.अहमदनगर येथील प्रमोद राधेशाम खंडेलवाल व इतर तिघांच्या शेतजमिनीत हेलिपॅड तयार करण्यात आले आहे.

हेलिपॅड परिसर त्याचप्रमाणे शनिशिंगणापूर येथील शनैश्वर मंदीर व मंदीर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे उप विभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या परिसरात कोणीही ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यासाठी वापर करणारे ड्रोन चालक, मालक, संस्था, आयोजक व नागरिक यांनी ड्रोन कॅमेरा किंवा तत्सम उपकरणाचा छायाचित्रीकरण करण्यासाठी दि. 30 नोव्हेंबर 2023 रोजीचे 12 वाजेपर्यंत वापर करु नये. आदेशाचे उल्लंघन करणारा इसम भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 मध्ये नमुद केलेल्या शिक्षेस पात्र राहणार असल्याचे एका आदेशाद्वारे कळविण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...