spot_img
ब्रेकिंगMaratha Reservation : आता आरक्षणासाठी 'बिहार पॅटर्न'; कसे असेल आरक्षण...

Maratha Reservation : आता आरक्षणासाठी ‘बिहार पॅटर्न’; कसे असेल आरक्षण…

spot_img

Maratha Reservation : उपमुख्यमंत्री पवार | विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू
मुंबई | नगर सह्याद्री – आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी वेळ द्यावा लागेल. आरक्षणासाठी बिहार सरकारने काही वेगळे निर्णय घेतले आहेत. आपले विधानसभा अधिवेशन होणार असून ‘बिहारसारखे काही करता येईल का?’ यावर आमची चर्चा सुरू आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा तिढा सोडवू असे आश्वासन दिले आहे. दुसर्‍या बाजूला मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश केला जाणार असल्याच्या चर्चा आहेत. या सर्व मुद्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार यांनी कराड येथे चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.

ते म्हणाले, राज्यासमोर आरक्षणासह इतर अनेक प्रश्न आहेत. प्रत्येकाला आपल्या समाजासाठी आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. परंतु, ते कायद्याच्या चौकटीत टिकले पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले होते. ते उच्च न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे समाजाला असे वाटते की राज्यकर्ते आम्हाला खेळवतायत. राज्यकर्त्यांबद्दल समज-गैरसमज निर्माण होतात.

अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या दसरा मेळाव्यात युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितले की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणारच. आमच्या सरकारचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तसा प्रयत्न चाललेला आहे. त्याचबरोबर इतरही समाजाचे नेते आपल्या भूमिका मांडत आहेत. भूमिका मांडण्याचा अधिकार वापरताना लोकांमध्ये कटुता येऊ नये, याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्रात ५२ टक्के आरक्षण आहे. एससी, एसटी, एनटी, ओबीसी असे सगळे मिळून ५२ टक्के आणि १० टक्के ईबीसी मिळून ६२ टक्के आरक्षण आधीच आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी नुकतीच सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत एकमताने ठरले आहे की, कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, असा मार्ग काढावा.

रोज कोणी काहीही बोलतो…
आरक्षणाच्या प्रश्नावरून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपावर विचारले असता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सगळ्याच पक्षांत वाचाळवीर वाढले आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे. अधिकाराचा वापर आपण कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. रोज कोणीतरी काहीतरी वक्तव्य करतो. कोणी अरे म्हटले की, का रे म्हणायचे असे चालू आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मी सगळ्याच पक्षांबद्दल बोलतोय. यामध्ये आम्ही (राष्ट्रवादी काँग्रेस) पण आलो. मी कोणालाही डोळ्यासोर ठेवून बोलत नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील सगळ्यांसाठीच बोललो. ठराविक कोणाबद्दल बोलत नाही. माझ्यासह सर्वांनीच आत्मपरिक्षण करायला हवे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटात राडा; मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात...

..अन् नायलॉन मांजाने आयुष्याचा दोर कापला, राज्यात ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू

Maharashtra News: मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर...

हवामान विभागाची महत्वाची अपडेट; थंडी गायब? ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Weather Update: राज्यामध्ये थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे...

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...