spot_img
ब्रेकिंग'कोरठण खंडोबा गडावर सोमवती अमावास्या उत्सव'

‘कोरठण खंडोबा गडावर सोमवती अमावास्या उत्सव’

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री

पिंपळगाव रोठा येथील राज्यस्तरीय ’ब’ वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असणारे कोरठण खंडोबा देवस्थान गडावर (दि १३) रोजी सोमवती अमावास्या उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महाप्रसादाचे अन्नदातांचे हस्ते महाआरतीचे नियोजन करण्यात आली असल्याची माहीती देवस्थानच्या अध्यक्षा शालिनीताई घुले यांनी दिली. या सोमवती आमवस्या निमित्ताने देवस्थानचे उपाध्यक्ष महेश शिरोळे, भाविक निवृत्ती खेडकर, अशोक फापाळे, कुशाभाऊ खोसे हे महाप्रसादाचे अन्नदाते आसुन यांच्या हस्ते महाआरती संपन्न होणार आहे.

यावेळी अध्यक्षा शालिनी घुले म्हणाल्या सोमवती अमावस्या पर्वणीनिमित्त देवाच्या उत्सवमूर्तीचे सकाळी ११ वाजता मंगल स्नानासाठी पालखी मिरवणुक प्रस्थान करणार आहे.लेझीमचे तालावर भाविक भंडारा उधळीत टाक्याचा दराकडे प्रस्थान होइल.उत्सव मूर्तींना गंगास्नान घातले जाईल. यावेळी भाविकांनी घरातून आणलेल्या देव्हार्‍यातील टाक स्वरूपातील देवांना ही गंगा स्नान घालून देव भेट हा धार्मिक कार्यक्रम पार पडेल.

दुपार नंतर पालखीचे मंदिराकडे येण्यास प्रस्थान होईल. मंदिराजवळ जागरण गोंधळ प्रसिध्द असणारे कोमल पाटोळे यांचे खंडोबा भक्तीगीतांचा पारंपारीक गितांचा कार्यक्रम पार पडणार आहे. देवस्थान तर्फे पिण्याचे पाणी, वाहने पार्किंग व दर्शनबारीचे नियोजन करण्यात आले आहे. या उत्सवास भाविकांनी सहभागी व्हावे आसे आवाहन खजिनदार तुकाराम जगताप, विश्वस्त अ‍ॅड पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष महेश शिरोळे, विश्वस्त राजेंद्र चौधरी, सचिव जालिंदर खोसे, सहसचिव कमलेश घुले, विश्वस्त चंद्रभान ठुबे, सुवर्णा घाडगे, अजित महांडुळे, रामचंद्र मुळे, धोंडीभाऊ जगताप, सुरेश फापाळे, दिलीप घुले, महादेव पुंडे या विश्वस्तांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...