spot_img
आर्थिकजास्त उत्पन्न नसले तरीही भरला पाहिजे टॅक्स रिटर्न ! मिळतात 'हे' प्रचंड...

जास्त उत्पन्न नसले तरीही भरला पाहिजे टॅक्स रिटर्न ! मिळतात ‘हे’ प्रचंड फायदे

spot_img

नगर सह्याद्री टीम : इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्स रिटर्न हे शब्द आपण नेहमीच ऐकतो. अनेक लोक ते भरत देखील असतील. परंतु तुम्हाला माहित आहे का की टॅक्स रिटर्न भरण्याचे अनेक फायदे मिळतात. जाणून घेऊयात त्याबद्दल –

1. कर्जाची पात्रता
जर तुम्ही कर्ज घेणार असाल तर बँक तुमची पात्रता तपासते, जी उत्पन्नावर आधारित असते. बँक तुम्हाला किती कर्ज देईल हे इन्कम टॅक्स रिटर्नमधील तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असते. खरं तर, आयटीआर हा एक दस्तऐवज आहे जो सर्व बँका कर्जाच्या सुलभ प्रक्रियेसाठी वापरतात. साधारणपणे बँका कर्ज प्रक्रियेदरम्यान ग्राहकांकडून ३ आयटीआरची मागणी करतात. त्यामुळे गृहकर्ज, कार लोन किंवा पर्सनल लोन घ्यायचे असेल तर आयटीआर भरणे आवश्यक आहे कारण त्यामुळे कर्ज मिळणे सोपे जाते.

2. टॅक्स रिफंड
तुम्ही आयटीआर फाइल केल्यास, मुदत ठेवींसारख्या बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजावरील कर वाचवू शकता. लाभांश उत्पन्नावरही कर वाचवता येतो. तुम्ही आयटीआर रिफंडद्वारे कराचा दावा करू शकता.

3. पत्ता, उत्पन्नाचा पुरावा यासाठी वैध कागदपत्र
वैध पत्त्याचा पुरावा म्हणून प्राप्तिकर मूल्यांकन आदेशाचा वापर केला जाऊ शकतो. आधार कार्ड बनवण्यासाठीही याचा वापर केला जाऊ शकतो. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना फॉर्म-१६ दिला जातो. जो त्याच्या उत्पन्नाचा पुरावा आहे. स्वयंरोजगार किंवा फ्रीलांसरसाठीही आयटीआर फाइलिंग डॉक्युमेंट वैध उत्पन्नाचा पुरावा म्हणून काम करते.

4. नुकसानिचा दावा करू शकतो
कोणत्याही नुकसानिचा दावा करण्यासाठी करदात्याने निर्धारित तारखेच्या आत आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. हा तोटा भांडवली नफा, व्यवसाय किंवा व्यवसायाच्या स्वरूपात असू शकतो. आयकर नियम संबंधित मूल्यांकन वर्षात आयटीआर दाखल करणार्‍यांना भांडवली नफ्यावरील तोटा पुढे नेण्याची परवानगी देतात.

5. व्हिसा प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे
तुम्ही परदेशात कुठे जात असाल तर बहुतेक देश आयटीआरची मागणी करतात. हे दर्शवते की ती टैक्स कंप्लायंट सिटिजन आहे. यामुळे व्हिसा प्रक्रिया अधिकाऱ्यांना तुमची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि उत्पन्नाची स्पष्ट कल्पना येते. यामुळे तुम्हाला व्हिसा मिळणे सोपे होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्करांच्या घरी राडा? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...

भाजपचे उमेदवार ठरले, आज पहिली यादी? कुणाला मिळणार डच्चू! वाचा सविस्तर…

Politics News : राज्यात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना दिवाळीपूर्वीच मिळणार खुशखबर!

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. आजच्या दिवशी...