spot_img
ब्रेकिंगPolitics News: ८५ वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात? लोकसभा संपताच विधानसभेची पेरणी सुरू

Politics News: ८५ वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात? लोकसभा संपताच विधानसभेची पेरणी सुरू

spot_img

पुणे । नगर सहयाद्री-
मागच्या आठवड्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदार संघातील चार मतदार संघांचा दौरा केल्यानंतर मंगळवारपासून पुन्हा तीन दिवस बारामती तालुक्याचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात ते संपूर्ण बारामती पिंजून काढणार असल्याचे बोलले जात आहे. अशाप्रकारे बारामती तालुका पिंजून काढणे म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्याच्या शरद पवार तयारीत असल्याच्या चर्चा संपूर्ण बारामतीसह राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

शरद पवार यांनी मंगळवारी बारामती तालुक्यातील निंबुत या गावापासून तीन दिवसीय दौऱ्याची तयारी केली. त्यांच्या या दौऱ्यात युगेंद्र पवार देखील सहभागी झाले आहेत. लोकसभा निवडणूक संपताच शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची पेरणी सुरू केली आहे. शरद पवार सध्या बारामती आणि परिसराचा दौरा करत आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यात शेतकरी मेळावे होणार आहेत. ३ दिवसांत शरद पवार ११ शेतकरी मेळाव्यांना हजेरी लावणार आहेत.

३५ वर्षांपूर्वी शरद पवार यांनी बारामतीचा कारभार अजित पवार यांच्याकडे सोपवल्यावर कधीच असा बारामतीचा भाग पिंजून काढला नव्हता. मात्र, आता शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहेत.आता खुद शरद पवार बारामती तालुका पिंजून काढत असल्यानं अजित पवारांच्या अडचणी वाढणार आहेत.

शरद पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन
शरद पवारांनी नुकतंच दुष्काळी दौऱ्या दरम्यान स्थानिकांशी संवाद साधला. तेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडे विनंती करणार आहे. मात्र सध्याचं सरकार माझं किती ऐकेल हे माहिती नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर राज्य हातात पाहिजे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला जसं आपण साथ दिली तशीच आगामी विधानसभा निवडणुकीतही साथ द्यावी, अशी साद पवारांनी शेतकऱ्यांना घातली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...