अपहारास जबाबदार असणार्या ४६ जणांची यादीच आली समोर | संचालक मंडळाला आझाद ठुबेने फाट्यावर मारले
पारनेर | नगर सह्याद्री
आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखाली राजे शिवाजी पतसंस्थेत ६७ कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी लेखा परीक्षकांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीतील नावे समोर आली आहेत. विशेष लेखा परीक्षक राजेंद्र निकम यांनी पारनेर पोलिस ठाण्यात अपहाराशी संबंधीत सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी स्वयंस्पष्ट अहवाल दिला असतानाही पारनेर पोलिसांनी अद्याप त्यावर वरीष्ठांना अहवाल का पाठवला नाही असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, ६७ कोटींचा अपहार झाला असला तरी हा झोल ८१ कोटी २५ लाख रुपयांचा झाला असल्याचेही याच अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
पोपट ढवळे आणि बाजीराव पानमंद आरोपींच्या यादीत!
राजे शिवाजी पतसंस्थेच्या माध्यमातून ठेवीदारांच्या पैशावर मौजमजा करत आझाद ठुबे यांना गळाला लावून पोपट ढवळे याने तब्बल २० कोटींचा झोल केला. आरोपींच्या यादीत आता पोपट ढवळे हा देखील आला आहे. याशिवाय गोरेश्वर पतसंस्थेचे बाजीराव पानमंद यांना देखील या अहवालात सहआरोपी करण्यात आले आहे.
* चेअरमन व त्यांचे नातेवाईक तसेच चेअरमन यांचे मर्जीतील व्यक्तींना पोटनियमबाह्य बोगस कर्ज अदा करुन केलेला अपहार (एकूण २४ कर्ज प्रकरणे)- ४४ कोटी ८१ लाख २१ हजार ६७८ रुपये. (आरोपी:- आझाद प्रभाकर ठुबे, संभाजी सिताराम भालेकर, स्वराज आझद दुबे, श्रीमती उज्वला आझाद दुबे, वैभव भाऊसाहेब रोहकले, भाऊसाहेब रावसाहेब रोहकले, सागर भाऊसाहेब रोहकले, किरण शंकर ठुबे, युसुफ हसन इनामदार, बाळकृष्ण संपत झावरे, ठुबे राजेंद्र दादाभाऊ, ठुबे अशोक एकनाथ, ठुबे ज्ञानेश्वर बापू, संदिप बाळासाहेब ठुबे, पोपट बोल्हाजी ढवळे, स्वामी समर्थ सिडलिंग प्रो. प्रा. दशरथ विठ्ठल शितोळे, सागर अशोसिएटस् प्रो. प्रा. सागर पोपट ढवळे) याच प्रकरणात सहआरोपी करण्यात आलेल्यांमध्ये सौ. चंद्ररेखा भाऊसाहेब रोहकले, सौ. दिपाली वैभव रोहकले, सौ शितल बाळकृष्ण झावरे, सौ. इनामदार तौसिन युसुब (सदरचे कर्जदार हे कुंटुंबातील महिला असुन कुंटुंबप्रमुखाच्या सांगण्यावरुन स्वाक्षरी केली असल्याचे गृहित धरले असुन त्यांचा मुळातच कर्ज घेणेबाबतचा गैरहेतु दिसून येत नाही तसेच त्या प्रत्यक्ष लाभार्थी नाहीत तथापी त्यांनी कर्जदार व जामिनदार म्हणुन स्वाक्षरी केलेल्या असल्यामुळे अपहारास मदत केली आहे ही बाब विचारात घेवुन त्यांना सहआरोपी करण्यात येत आहे.)यांचा समावेश आहे.
* हेड ऑफीसने वाघोली शाखेस १ कोटी रुपये अदा केले असून वाघोली शाखेस जमा नाही व वाघोली शाखेत हेड ऑफीस खाती ६५ लाख रोख नावे असून ही रक्कम हेड ऑफीसला जमा केलेली नसून त्याचा अपहार झाला आहे. अपहार १ कोटी ६५ लाख रुपये. (आरोपी:- श्री. आझाद प्रभाकर ठुबे, श्री. संभाजी सिताराम भालेकर)
* चेअरमन आझाद ठुबे – ५ कोटी २२ लाख १२ हजार ५००, स्वराज आझाद ठुबे – १७ लाख ८९ हजार ५००, उज्वला आझाद ठुबे- १ लाख, मॅनेजर भालेकर १ लाख ३२ हजार ५०० रुपये यांना अॅडव्हान्स अदा करुन अपहार केला. ५ कोटी ४२ लाख ३४ हजार ५०० रुपये. (आरोपी:- श्री. आझाद प्रभाकर ठुबे, श्री. संभाजी सिताराम भालेकर, श्री. स्वराज आझाद ठुबे, श्रीमती उज्वला आझाद ठुबे, सहआरोपी:- श्री. बाजीराव शंकर पानमंद)
* श्री. रिकामे कुटुंबिय व इतर १२ कर्जदारांना पोटनियमबाह्य बोगस कर्ज अदा करुन केलेला अपहार. ६ कोटी ७२ लाख ३२ हजार २९२ रुपये. (आरोपी:- श्री. आझाद प्रभाकर ठुबे, श्री. संभाजी सिताराम भालेकर, श्री. पोपट बोल्हाजी ढवळे, सागर असोशिएटस् प्रो. प्रा. श्री. पोपट बोल्हाजी ढवळे व श्री. सागर पोपट ढवळे)
* श्री. ढवळे कुटुंबिय व इतर १८ कर्ज प्रकरणात बोगस आणि पोटनियमबाह्य कर्ज देऊन केलेला अपहार. १० कोटी ४५ लाख ८४ हजार ७३२ रुपये. (आरोपी:- श्री. आझाद प्रभाकर ठुबे, श्री. संभाजी सिताराम भालेकर, श्री. पोपट बोल्हाजी ढवळे, श्री. सागर पोपट ढवळे, श्रीमती आरती अनिल ढवळे, श्री. अदित्य संतोष ढवळे, श्री. अनिल बोल्हाजी ढवळे, श्री. संतोष बोल्हाजी ढवळे, श्री. दिपक यशवंत पाटील)
दि. ३१ मार्च २०२४ अखेर हातावरील शिलकेचा केलेला अपहार. २९ लाख ३२ हजार ६३० रुपये. (आरोपी:- श्री. आझाद प्रभाकर ठुबे, श्री. संभाजी सिताराम भालेकर)
* श्री महाडीक कुटुंबिय व अन्य ६ नियमबाह्य, बोगस कर्ज प्रकरणातील अपहार. (सुपा शाखा) ३ कोटी ६० लाख ४१ हजार ७७० रुपये. (आरोपी:- श्री. आझाद प्रभाकर ठुबे, श्री. संभाजी सिताराम भालेकर, श्री. पोपट बोल्हाजी ढवळे, श्री महाडिक कावेरी किरण, श्री पवार तात्यासाहेब दशरथ, श्री महाडिक मंगल मच्छिद्र, श्री महाडिक किरण मच्छिद्र, श्री महाडिक मच्छिद्र अंतोबा, श्री महाडिक सुरज मच्छिद्र)
* कातोरे कुटुंबिय व अन्य तीन बोगस कर्जप्रकरणातील अपहार- १ कोटी ३९ लाख ८० हजार ६८२ रुपये. (आरोपी:- श्री. आझाद प्रभाकर ठुबे, श्री. संभाजी सिताराम भालेकर, श्री. पोपट बोल्हाजी ढवळे, श्रीमती आशा बाबुराव कातोरे, श्री. राजु बाबुराव कातोरे, श्री. बापु बाबुराव कातोरे)
* इतर बोगस कर्जदारांना नियमबाह्य १० कर्ज प्रकरणातील अपहार. ६ कोटी ८९ लाख ३५ हजार १२६ रुपये. (आरोपी:- श्री. आझाद प्रभाकर ठुबे, श्री. संभाजी सिताराम भालेकर, श्री. हनुमंत बाबुराव साबळे, श्री. दशरथ विठ्ठल शितोळे, श्री. अजहर इसाक शेख, श्री. राहुल पंढरीनाथ देशमुख, श्री. गणेश बाळु राऊत, श्री. अक्षय सुनिल नेमाणे. श्री. स्वराज आझाद ठुबे, श्रीमती उज्वला आझाद ठुबे, सारिका विश्वनाथ आदक.)