spot_img
अहमदनगरशिक्षक बँकेला आठ कोटी २६ लाखांचा नफा; अध्यक्ष बाळू सरोदे, उपाध्यक्ष रमेश...

शिक्षक बँकेला आठ कोटी २६ लाखांचा नफा; अध्यक्ष बाळू सरोदे, उपाध्यक्ष रमेश गोरे यांची माहिती

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ८ कोटी २६ लाख ८३ हजार २५५ इतका निव्वळ नफा झाला आहे. त्यातून आवश्यक त्या तरतुदी वजा जाता सभासदांना सात टक्के प्रमाणे लाभांश वार्षिक सभेनंतर देण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष बाळु सरोदे व उपाध्यक्ष रमेश गोरे यांनी दिली. शिक्षक बँकेेच्या वार्षिक सभेनिमित्त बँकेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अहवाल सालात बँकेच्या कर्जावरील व्याजदरात कपात करण्यात आली असून सध्या बँकेच्या कर्जाचा व्याजदर हा ८.४० व ७.९० टक्के आहे. एवढ्या कमी व्याजदारामध्ये कर्ज वितरण करणारी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ही राज्यातील एकमेव बँक आहे. गुरुमाऊली मंडळ सत्तेत आल्यापासून झालेले निर्णय फक्त आणि फक्त सभासद हित डोळयासमोर ठेउन घेतलेले आहेत. मागिल २६ वर्षात झाला नाही असा आदर्श कारभार गेल्या ७ वर्षामध्ये संचालक मंडळाने केला आहे.

सभासदांना ४१ लाख रूपये कर्ज वितरण करणारी शिक्षक बँक ही एकमेव बँक आहे. या अहवाल सालामध्ये बँकेच्या ठेवीमध्ये १६३ कोटी रूपयांची वाढ झालेली आहे. मार्च अखेर बँकेच्या ठेवी १४५९ कोटी आहेत. हा सभासद व ठेवीदार यांनी संचालक मंडळावर दाखविलेला विश्वास आहे.सभासद कल्याणनिधीमधून सभासद व त्यांच्या पाल्यांना पारितोषिके २५ हजारापर्यंत वैद्यकीय मदत व ३ हजार रुपये अंत्यसेवा मदत दिली जाते. सभासद कर्ज निवारण निधीमधून मयत सभासदांचे ४१ लाखा पर्यतचे कर्ज माफ केले जाते. तसेच कुटुंबआधार निधीमधून मयत सभासद, कर्मचारी यांचे वारसास १५ लाख रुपये आर्थिक मदत व सेवानिवृत्त होणार्‍या सभासदांना बँकेतर्फे ११ हजार कृतज्ञता निधी दिला जातो.

संचालक मंडळाने रविवार दि.०८ सप्टेंबर २०२४ रोजी होणार्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासद कर्ज निवारण निधी व रिझर्व्ह बँकेच्या सुचनेप्रमाणे पोटनियम दुरूस्ती सुचविलेली आहे. तसेच संगमनेर शाखेसाठी नविन व जामखेड शाखा कार्यालयासाठी स्वमालकीची जागा घेणेबाबत शिफारस मंजूरीसाठी ठेवली आहे. तसेच सभासद कर्ज निवारण निधी, मयत सभसदांचे कर्ज बार करणेसाठी निधी कमी पडत असल्याने कुटुंबआधार निधीमधून १ कोटी ७५ लाख सभासद कर्ज निवारण निधीमध्ये वर्ग करण्यास मंजूरी मिळण्यासाठी संचालक मंडळाने शिफारस केली आहे. बँकेची १०५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ८ सप्टेंबर २०२४ रोजी होत आहे.

याप्रसंगी शिक्षक नेते सुरेश निवडूंगे, राजकुमार साळवे, विद्युल्लता आढाव, साहेबराव अनाप, राजू राहाणे, किसन खेमनर, अर्जुन शिरसाठ, बाबा खरात, आर.टी. साबळे, बाळासाहेब मुखेकर, राम वाकचौरे व इतर मान्यवर उपस्थित होते. पत्रकार परिषदेस संचालक चेअरमन बाळु सरोदे, व्हा. चेअरमन रमेश गोरे, संचालक सर्वश्री कैलास सारोक्ते, आण्णासाहेब आभाळे, भाऊराव राहिज, शशिकांत जेजुरकर, योगेश वाघमारे, माणिक कदम, सुर्यकांत काळे, संतोषकुमार राऊत, ज्ञानेश्वर शिरसाट, शिवाजी कराड, बाळासाहेब तापकिर, रामेश्वर चोपडे, संदीप मोटे, कारभारी बाबर, गोरक्षनाथ विटनोर, महेंद्र भणभणे, कल्याण लवांडे, श्रीम. सरस्वती घुले, निर्गुणा बांगर, विठठल फुंदे, दिनेश खोसे उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“काकाचं दर्शन घे, थोडक्यात वाचलास….”; अजित पवारांचा रोहित पवारांना टोला

मुंबई / नगर सह्याद्री - संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे....

मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग...

नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ...

पारनेरकरांना खुशखबर! मंत्री विखे पाटील म्हणाले, पुढील काळात..

आ. काशिनाथ दाते यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घेतली भेट पारनेर | नगर सह्याद्री पारनेर...