spot_img
ब्रेकिंगएकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू! सिद्धार्थ कॉलनीत नेमकं काय घडलं..

एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू! सिद्धार्थ कॉलनीत नेमकं काय घडलं..

spot_img

Breaking News: एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कटूंब साखरझोपेत असतांना आग लागल्याची माहिती मिळत आहे. पहाटे साडेचार ते साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये एका सात वर्षीय मुलीचा आणि १० वर्षीय मुलाचा समावेश आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

चेंबुरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आज पहाटे भीषण आग लागली. यात एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर परिसरातील काही नागरिकही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. इतर नागरिकांना घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे.

यामध्ये कटूंबातील सात वर्षीय मुलीचा आणि दहा वर्षीय मुलाचा समावेश आहे. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...