spot_img
अहमदनगरराज्यात 65.11 टक्के तर नगर जिल्ह्यात 71.73 टक्के मतदान

राज्यात 65.11 टक्के तर नगर जिल्ह्यात 71.73 टक्के मतदान

spot_img

30 वर्षांमधील सर्वाधिक प्रतिसाद, कोल्हापूर जिल्हा हा सर्वात जागरुक, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात निरुत्साह
मुंबई । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीत बुधवारी राज्यात सरासरी 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 71.30 टक्के इतके मतदान झाले आहे. सहा महिन्यांपूव झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढल्याचं चित्र आहे. अखेरच्या काही तासांत मतदानाने जोर पकडल्याचे चित्र राज्याच्या काही भागांत पाहायला मिळालं. गावखेड्यांमधील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरी भागांमध्ये काहीसा निरुत्साह कायम असल्याचे दिसले. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही केंद्रांवर रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान चालू होतं. त्यामुळे मतदानाची जिल्हानिहाय अंतिम आकडेवारी येण्यास विलंब झाला.

रात्री 11.45 वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 65.11 टक्के मतदान झालं आहे.मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार मोठ्या शहरांमध्ये मतदानाचं प्रमाण वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते. मात्र त्याला फारसे यश आले नसल्याचे पाहायला मिळाले. राज्यात सर्वाधिक 82 टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात झाल आहे. तेथे वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) समरजितसिंह घाटगे यांच्यातच चुरशीची लढत होत आहे. सर्वात कमी 41 टक्के मतदान हे कल्याण पश्चिम मतदारसंघात झालं आहे. मंत्रालय व विधानभवन ही सत्तेची प्रमुख केंद्रे असलेल्या कुलाबा मतदारसंघांत टक्केवारी वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न झाले असले तरी तिथे 45 टक्केच मतदान झाले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात सरासरी 65.11 टक्के मतदान झालं आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 1995 साली 71.69 टक्के मतदानाची नोंद झाली होती. अलीकडच्या काही वर्षांमध्ये राज्यात कधीच 65 टक्क्यांहून अधिक मतदान झालं नव्हतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 61.39 टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 61.40 टक्के मतदान झालं होतं. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 3.7 टक्के मतदान वाढलं आहे. ही मतदानाची वाढलेली आकडेवारी निवडणुकीच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. दरम्यान, 2019 मध्ये राज्यात 08.85 कोटी नोंदणीकृत मतदार होते. त्यात गेल्या पाच वर्षांमध्ये 09.50 टक्के वाढ झाली असून राज्यात आता 09.69 टक्के मतदार आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. अहिल्यानगर – 71.73 टक्के, अकोला – 64.98, अमरावती – 65.57, छत्रपती संभाजीनगर – 68.89, बीड – 67.79, भंडारा – 69.42, बुलढाणा – 70.32, चंद्रपूर – 71.27, धुळे – 64.70, गडचिरोली – 73.68, गोंदिया – 69.53, हिंगोली – 71.10, जळगाव – 64.42, जालना – 72.30, कोल्हापूर – 76.25, लातूर – 66.92, मुंबई शहर – 52.07, मुंबई उपनगर – 55.77, नागपूर – 60.49, नांदेड – 64.92, नंदुरबार – 69.15, नाशिक – 67.57, धाराशिव – 64.27, पालघर – 65.95, परभणी – 70.38, पुणे – 61.05, रायगड – 67.23, रत्नागिरी – 64.55, सांगली -71.89, सातारा – 71.71, सिंधुदुर्ग – 68.40, सोलापूर – 67.36, ठाणे – 56.05, वर्धा – 68.30, वाशिम – 66.01, यवतमाळ – 69.02 टक्के.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शिरसाटवाडी मतदान केंद्रावर काय घडलं?; काय म्हणाल्या आमदार मोनिकाताईं राजळे? वाचा सविस्तर..

पाथर्डी | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली. आररोप प्रत्यारोप, कुठे पैशाचे...

अदानी अडचणीत; अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल; काय आहे नेमके प्रकरण?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे....

CM पदाबाबत संजय राऊत यांचे मोठे विधान; थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : विधानसभा निडवणुकीच्या मतदानानंतर बुधवारी समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या...

विजयाचा कॉन्फिडन्स! निकालापूर्वीच आमदार जगताप यांचे झळकले बॅनर

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. जिल्ह्यातील 12 ही विधानसभा मतदारसंघात...