spot_img
देश...नगरमधील गेस्ट हाऊसमध्ये वेश्याव्यवसाय; एका रात्रीसाठी ६ हजार; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

…नगरमधील गेस्ट हाऊसमध्ये वेश्याव्यवसाय; एका रात्रीसाठी ६ हजार; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

spot_img

Crime News: गुवाहाटीतील जोया नगर परिसरातील एका गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका रात्रीसाठी ६ हजार रुपये आकारले जात होते, अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर मंगळवारी ही धाड घालण्यात आली. डीसीपी मृणाल डेका यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिसपूर पोलीस ठाण्यात या रॅकेटविरोधात तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. सदर गेस्ट हाऊस गेल्या ८ महिन्यांपासून बेकायदेशीर वेश्याव्यवसायासाठी वापरले जात होते, असे तपासात उघड झाले आहे. इतकेच नव्हे तर, या गेस्ट हाऊसशिवाय इतर काही हॉटेल्समध्येही अशा स्वरूपाचा व्यवसाय सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

हॉटेल मालकासह चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीतून आणखी काही धक्कादायक माहिती मिळण्याची शक्यता आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी सापडलेले रजिस्टर, सीसीटीव्ही फुटेज आणि एका पुरुष व महिलेमधील ऑडिओ क्लिप देखील तपासणीसाठी जप्त करण्यात आली आहेत.

सुटका करण्यात आलेल्या तीन महिलांचे वय २० ते २८ दरम्यान असून, त्या गुवाहाटीतील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या महिलांना दरमहा सुमारे १८ हजार रुपये मोबदला दिला जात होता. पोलिसांनी याप्रकरणात सखोल तपास सुरू केला असून, या रॅकेटमध्ये आणखी काही जण सामील असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील काही दिवसांत अधिक आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आदिवासी मोर्चाला हिंसक वळण; आंदोलनात दगडफेक,वाहनांची तोडफोड

नंदूरबार / नगर सह्याद्री - नंदूरबारमधील आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलनात दगडफेक झाल्यानंतर...

शिर्डी साई संस्थान समितीच्या नियुक्तीला स्थगिती

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिर्डी साई संस्थान समितीप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला असून...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पारनेर दौऱ्याला विरोध; भूमिपुत्र संघटना व पारनेर कारखाना बचाव समिती आक्रमक

पारनेर | नगर सह्याद्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दि. 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्याचे...

पारनेर तालुक्यात ‘आर्थिक’ सुनामीची लाट; ‘या’ पतसंस्थेत 81 कोटींचा अपहार

पारनेर | नगर सह्याद्री कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील राजे शिवाजी सहकारी पतसंस्थेत तब्बल 81...