spot_img
अहमदनगरराणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त

spot_img

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त

महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

पारनेर/प्रतिनिधी
सर्वसामान्य जनता हेच माझे कुटूंब माणून समाजकारण, राजकारण करणाऱ्या खा. नीलेश लंके यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राणीताई लंके यांचा एबी फॉर्म आणण्यासाठी त्यांच्या सामान्य कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्यालयात पाठवित कार्यकर्त्यांवरील विश्‍वास अधोरेखीत केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची उमेदवारी राणीताई लंके यांना पूर्वीच निश्‍चित करण्यात आली होती. निवडणूक जाहिर झाल्यानंतरही त्यांचेच नाव आघाडीवर होते. राष्ट्रवादी काँग्रसची यादी जाहिर होण्यापूर्वीच मंंगळवारी लंके यांचा एबी फॉर्म पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आदीती नलावडे यांनी सकाळी दहा वाजता पक्ष कार्यालयात लंके यांचे सहकारी सुरेश धुरपते, गोरख आहेर, गोविंद साबळे, दिलीप कोरडे, संजय बाबर, सुरेश ढवण, त्रिंबक ठुबे, सुभाष गायकवाड, नाना गाडगे, बाळासाहेब ठुबे, शिवाजी वाफारे, अशोक वाफारे, शहाजी आवारे, नीलेश शिंदे, नितीन कवडे, दता वाबळे, सुनील पानमंद, अय्याज पठाण, विजय कानसकर, दादाभाऊ कावरे यांच्याकडे सूपूर्द केला.
एबी फॉर्म मिळाल्यानंतर लंके यांच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर येथे सुरू असलेल्या बुथ कमिटीच्या बैठकीत तो उमेदवार राणीताई लंके यांच्याकडे सपूर्द करण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जनता दरबारात तक्रारींचा पाऊस; आमदार काशिनाथ दाते आक्रमक, म्हणाले…

आमदार काशीनाथ दाते | तक्रारींचा पाऊस | तातडीने निराकारण करण्याचे आश्वासन पारनेर | नगर सह्याद्री:- पारनेर...

सावधान! जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट, कुठे काय परिस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान...

भोकला म्हणून कुत्र्याला बेदम मारहाण, मारहाणीत मृत्यू, पुढे घडले भयंकर…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- रस्त्याने जाताना कुत्रा भुंकल्याने चिडलेल्या व्यक्तीने झाडाच्या फांदीने त्याला बेदम झोडपले....

… तर पै. शिवराज राक्षेवरील बंदी मागे घेऊ; कुस्तीगीर परिषद

पुणे | नगर सह्याद्री:- अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती 2025 या स्पर्धेमध्ये पै. शिवराज राक्षेने...