spot_img
अहमदनगरसुप्यात ५०० कोटींची गुंतवणूक; १ हजार २०० जणांना मिळणार रोजगार

सुप्यात ५०० कोटींची गुंतवणूक; १ हजार २०० जणांना मिळणार रोजगार

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
टॉरल इंडिया या आघाडीच्या एकात्मिक ॲल्युमिनियम फाउंड्रीने सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीमध्ये ५०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्योगामुळे पारनेर तालुक्यातील १ हजार २०० बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

टॉरल इंडियाने त्यांच्या प्रगत उत्पादन सुविधेचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सांमजस्य करार केला आहे. पुण्यातील टॉरल इंडियाची सध्याची ३ लाख चौरस फुट सुविधा उत्पादन डिझाईनपासून ते गुणवत्ता चाचणी, रंगकाम, असेंब्ली, आणि वितरणापर्यंत व्यापक ॲल्युमिनियम सॅड-कास्टिंग सोल्यूशन प्रदान करते.

उर्जा संरक्षण एरोस्पेस, सागरी, रेल्वे आणि आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रातील वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी विस्तारित सुपा येथील सुविधा चार पट मोठी असेल. या महत्वपुर्ण गुंतवणूकीसह टॉरेल इंडियाचे उद्दीष्ट नवोपक्रमांना चालना देणे, स्थानिक प्रतिभेला सक्षम करणे आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक महत्वाकांक्षेत योगदान देताना महत्वाच्या उद्योगांमध्ये भारताचे स्वावलंबन वाढविणे आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...