spot_img
अहमदनगर20 कोटी मिळवून देण्याच्या नावाखाली 50 लाखांना चुना!

20 कोटी मिळवून देण्याच्या नावाखाली 50 लाखांना चुना!

spot_img

जयंत कंठाळे, सागर ऊर्णे, योगेश घुले, गणेश शिंदे यांच्या विरोधात कोतवालीत गुन्हा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
हवालामार्फत वीस कोटी रुपये मिळवून देण्याचे अमिष दाखवत विशाल रमेश भांबरे (रुईछत्तीसी, नगर) या हॉटेल व्यावसायिकाला तब्बल 50 लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या चार महाठगांच्या विरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जयंत कंठाळे व गणेश शिंदे हे या प्रमुख दोन महाठगांसह योगेश घुले आणि सागर ऊर्णे यांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला असून आरोपींच्या शोधार्थ कोतवाली पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, विशाल रमेश भांबरे यांना पैशाची अडचण होती आणि त्यातून त्यांनी कर्ज मिळण्यासाठी चौकशी केली. त्यानुसार जयंत कंठाळे याने कटकारस्थान रचून विशाल भांबरे याला गळाला लावले आणि वीस कोटी रुपये हवाला मार्फत देण्याची व्यवस्था करतो असे सांगितले. गुजरात मधील एक प्रायव्हेट फंडींग कंपनी आहे. ती हवाला मार्फत फंडींग करते. ती किमान 20 कोटीच्या खाली पेमेंट करत नाही, असे सांगितल्यावर भांबरे याने, ‌’मला इतक्या जास्त पैशांची आवश्यकता नाही. मला 10 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

त्यावर मी त्यांना गुजरातच्या प्रायव्हेट फंडींग कंपनीची प्रोसीजर विचारली. त्यावर जयंत कंठाळे हे त्याला म्हणाले की, फक्त प्रासेसींग फि द्यावी लागेल. 20 कोटीला 20 लाख रुपये द्यावे लागले व ॲग्रीमेंट करुन चेक द्यावे लागेल. त्यानंतर ते हवाला मार्फत तुम्हाला 20 कोटी रुपये देतील. हे काम सागर ऊर्णे (शेरकर गल्ली, माळीवाडा) यांच्याकडे आहे. आपण त्यांच्या ऑफिसमध्ये जावुन बोलु असे बोलुन फोन ठेवुन दिला.त्यानंतर योगेश घुले आणि गणेश शिंदे यांची भेट झाली. गणेश राजेंद्र शिंदे (लोकसेवा प्रेस, आझाद चौक, नगर अर्बन बँक रोड, नवीपेठ,) यांचे योगेश घुले हे जवळचे मित्र आहेत.

त्यानंतर आम्ही पुणे एअरपोर्ट रोड च्या विमान नगर, सिम्बॉयसेस कॉलेज समोरील एका कॅफेमध्ये (कॅफेचे नाव माहित नाही.) आम्ही बसलेलो असताना. गणेश शिंदे यांनी मला सांगितले की, प्रायव्हेट फंडींग हे अहमदाबाद येथे आहे. आपल्याला गुजरातला जावा लागेल. तेथे प्रायव्हेट फंडींगचे काम करतात. आपल्याला आधि प्रोसेसींग फी 20 लाख रुपये कॅश देवून देवून ॲग्रीमेंट करुन सेम डे किंवा दुसऱ्या दिवशी कॅश स्वरुपात फंडींग करतील व स्टॉप ड्युटीची लीगल पावती भेटेल. त्यावर मी त्यांना म्हणालो की, काही फ्रॉड झाला तर याचा जिमेदारी कोण घेईल. त्यावर गणेश शिंदे हे म्हणाले की, जर काम नाही झाले तर किंवा फ्रॉड झाला तर तुम्ही भरलेले 20 लाख रुपये मी तुम्हाला देईल. याची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. असे आमचे बोलणे झाले.

त्यानंतरमी आम्ही तीघे दि. 02/03/2025 रोजी सायंकाळच्या फ्लाईटने अहमदाबाद, गुजरात येथे गेलो. व दुसऱ्या फ्लाईटने गणेश शिंदे हे तेथे आले. व दि. 03/03/2025 रोजी गणेश शिंदे हे आम्हांला तेथे भेटले व आम्ही चौघे जन सायन्स सिटी, फॉर्च्यून बिजनेस हब, 8 वा मजला, अहमदाबाद, गुजरात तो ‌’आपणा भारत‌’ या ऑफिसमध्ये गेलो असता तेथे गणेश शिंदे यांनी आम्हांला अनुराग पटेल या व्यक्तीशी भेटवले. त्या व्यक्तीने आम्हांला फंडींग बद्दल माहिती देवुन आम्हांला सांगितले की, प्रोसेसींग फि ही तुम्हांला कॅशमध्ये द्यावा लागेल. आम्ही तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरल्याची लीगल पावती देवु. तेव्हा भी त्यांना विचारले की, तुम्ही मला हे पैसे एकदम का देता.

मला टप्याटप्याने देता येईल का ? त्यावर अनुराग पटेल हे म्हणाले की, तुम्हांला वनस्ट्रोक 20 कोटी रुपये घ्यावा लागतील. तुम्हाला तुमचे 20 कोटी रुपये पोहोचवण्याची जबाबदारी आमची व पैसे मोजुन घेवुन पर्यंत जबाबदारी आमची राहिल त्यानंतर आमची जबाबदारी नाही. असे बोलुन माझा विश्वास संपादन करुन आम्ही हॉटेल ग्रॅण्ड पिनॅकल येथील लॉजिंग रुमवर गेलो. त्यानंतर दि. 05/03/2025 रोजी सायन्स सिटी येथील कोर्ट आवारामध्ये असताना. अनुराग पटेल यांनी ॲग्रीमेंट करण्यासाठी त्यांचा एक माणुस पाठविला होता.

(त्याचे नाव माहित नाही.) ॲग्रीमेंट झाल्यावर मी त्या व्यक्तीकडे प्रोसेसींग फी 20 लाख रुपये हे मी माझ्या मित्राकडुन मागुन घेवुन त्यांना दिले. त्यानंतर आम्ही तेथुन अनुराग पटेल यांनी दिलेल्या लोकेशनवर गेलो असता. अनुराग पटेल हे मला म्हणाले की, 20 कोटी रुपये घेण्यासाठी एक सी. एम. एस. चार चाकी गाडी लागेल. ही गाडी फक्त बँकांनाच मिळू शकत असतानाही त्याबाबत लपवालपवी केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत कोतवाली पोलिसांनी जयंत कंठाळे, सागर ऊण, योगेश घुले, गणेश शिंदे यांच्या विरोधात कोतवालीत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.

मोठे रॅकेट हाती येणार; पोलीस निरीक्षक प्रताप दराडे
हवाला मार्फत अशा पद्धतीने जास्तीचे पैसे मिळवून देणारे मोठे रॅकेट नगरमध्ये असल्याचे समोर आले असून गणेश शिंदे आणि जयंत कंठाळे हे त्यांच्या आणखी काही साथिदारांसह हे रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाणार आहोत. यात कोणालाही सोडणार नाही. अशा पद्धतीने फसवणूक झालेल्यांनी कोतवाली पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले आहे.

सीएमएस गाडीच्या नावाखाली उकळले 10 लाख!
हवाला मार्फत मिळणारे वीस कोटी रुपये स्वत:च्या खासगी भाड्यानी घेतलेल्या गाडीच्या डीक्कीमध्ये देण्याची मागणी केल्यानंतर अनुराग पटेल हे म्हणाले की, तुमच्या गाडीमध्ये होणार नाही. आम्ही प्रायव्हेट गाडीमध्ये पैसे देत नाही. आम्ही रिस्क घेऊ शकत नाही. तुम्हांला 20 कोटी रुपयाचे इन्शुरन्स व गाडीचे भाडे मिळुन 40 लाख रुपये भरावे लागतील. त्यावर मी त्यांना म्हणालो की, माझ्या कडे आता येवढी रक्कम नाही. त्यावर ते मला म्हणाले की, उद्या शनिवार व रविवार असल्याने आमचे ऑफिस बंद असते तुम्ही सोमवारी या व ते 40 लाख रुपये आमच्या कडे कॅश देवुन तुम्हाला त्याची सुध्दा रितसर पावती मिळेल व तो पेमेंट आम्ही सी एम एस गाडी मध्ये भरुन तुमच्या हवाला पर्यंत पोहच करतो. असे बोलुन आम्ही तेथुन निघुन गेलो. यानंतर अनुराग पटेल हे मला म्हणाले की, तुम्हाला पाच वाजे पर्यंत 20 कोटी रुपयांची डीलेव्हरी देतो. पण तुम्हाला आता किमान 10 लाख रुपये इन्शुरन्सचे द्यावे लागतील. असे म्हणाल्यावर मी माझ्या मित्रा कडुन 10 लाख रुपये मागुन घेतले व त्यांना मी म्हणालो की, तुम्ही सी एम एस गाडी मध्ये 20 कोटी रुपये घेवुन आल्यावर मी तुम्हाला ते 10 लाख रुपये देईल, असे सांगितल्यानंतर प्रत्यक्षात अनुराग पटेल व गणेश शिंदे हे एक सी एम एस गाडी व चार अनोळखी बंदुकधारी सुरक्षा गार्ड घेवुन तेथे आले. त्यांनी दमदाटी करुन अनुराग पटेल व गणेश शिंदे यांनी त्यांच्या कडील बंदुक काढुन माझ्या डोक्याला लावुन माझ्याकडुन 10 लाख रुपये घेवुन तेथुन निघुन गेले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भिकारी सरकार! कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान

रमी व्हिडीओनंतर पत्रकार परिषदेत सरकारलाच ठरवले 'भिकारी', विरोधक आक्रमक नाशिक | नगर सहयाद्री:- राज्याचे कृषीमंत्री...

एमआयडीसीत भयंकर प्रकार; धारदार कोयत्याने हल्ला..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री गजराजनगर, काळा माथा परिसरात जुन्या वादातून सात जणांनी मिळून एका व्यक्तीवर...

सरपंच पदासाठी बुधवारी, गुरुवारी आरक्षण सोडत; वाचा सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- गाव पातळीवरील राजकारणात महत्त्वपूर्ण असणाऱ्या सरपंच पदाचे आरक्षण आता पुन्हा एकदा...

दीड कोटी ऑनलाईन घेतले; पोलीस खात्यातील चौघे निलंबित

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी ग्रो मोअर इन्व्हेसमेंट...