पारनेर | नगर सह्याद्री
गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक 2025 चे मतदान रविवार, दि. 8 जून रोजी शांततेत आणि उत्साहात पार पडले. या निवडणुकीत 7 हजार 137 मतदारांनी (48.48 टक्के) मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण पारनेरकरांचे लक्ष लागले आहे.
गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुकीत संस्थापक बाजीराव पानमंद यांच्या गोरेश्वर सहकार संस्थापक पॅनल आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या श्री. गोरेश्वर सहकार बचाव पॅनल यांच्यात थेट लढत झाली.
एकूण 26 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली.एकूण 14 हजार 718 मतदारांपैकी 7,137 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानापैकी 48.48 % मतदान यावेळी झाले. गोरेगाव येथे 324, 377, 400, 321, पाडळी तर्फे कान्हूर येथे 444, भाळवणी येथे 265, 261, 282, 223, दैठणे गुंजाळ येथे 221, 196, ढवळपुरी येथे 268, 245, 239, सुपा येथे 183, 155, पारनेर येथे 163, 164, 165, जवळा येथे 251, 194, पळवे येथे 311, राळेगण थेरपाळ येथे 375, 459 आणि कर्जुले हर्या येथे 308, 343 मते पडली.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही पॅनलने जोरदार प्रचार करत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. सहकारी पतसंस्था टिकविण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढत आहोत, असे श्री गोरेश्वर सहकार बचाव पॅनलच्या प्रमुखांनी सांगितले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी मतदारांना आपापल्या बाजूने वळविण्यासाठी शथचे प्रयत्न केले. पतसंस्थेच्या भवितव्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. मतमोजणीनंतर कोणता पॅनल विजयी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.