spot_img
अहमदनगरबिबट्याच्या हल्ल्यात पारनेर तालुक्यात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात पारनेर तालुक्यात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

spot_img

 

कळस परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी

गणेश जगदाळे / नगर सह्याद्री :
पारनेर तालुक्यातील कळस येथे मंगळवारी (दि. 2 सप्टेंबर 2025) रात्री साडेसातच्या सुमारास बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात गणेश तुळशीराम गाडगे (वय 40) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील सुतार वस्तीजवळ ही धक्कादायक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गाडगे हे कळसहून रानमळ्याच्या रस्त्याने घरी परतत असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. रात्री आठ वाजेपर्यंत ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता हा प्रकार उघडकीस आला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेव्हाच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कळस परिसरात उसाचे प्रमाण जास्त असल्याने या भागात बिबट्यांचा वावर नेहमीच जाणवतो. यापूर्वी जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या असल्या, तरी मानवी जीवितहानीची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ग्रामस्थांच्या मते, रात्रीच्या वेळी शेतातून घरी परतताना अथवा बाहेर पडताना सतत धोका जाणवतो.

या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करणे, पिंजरे लावणे, रात्रीच्या वेळी गस्त वाढवणे अशा खबरदारीच्या उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, परिसरात पिंजरे लावण्याचे नियोजन असल्याचे सांगितले आहे. तसेच ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

गणेश गाडगेंच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांनी प्रशासनाला त्वरित कारवाई करून बिबट्यांचा धोका कमी करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...