Ladki Bahin Yojana News : विधानसभा निवडणूक निकालानंतर लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणी होत आहे. साधारण २ कोटी ३१ लाख ८६० महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. मात्र आता महायुती सत्तेवर आल्यानंतर अपात्र बहिणींना योजनेतून वगळण्यास सुरुवात झाली आहे. कारण या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पडत आहे.
एका पेक्षा जास्त सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख लाभार्थ्यांची संख्या कमी झाली होती. मात्र आता निकषांनुसार पडताळणी केल्यानंतर ही संख्या तब्बल 40 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. योजनेचा सर्वाधिक फायदा पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी घेतला आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये विवाहित महिलांचं प्रमाण 83 टक्के आहे. विधवा महिलांचं प्रमाण 4.7 टक्के आहे. अविवाहित महिलांचं प्रमाण 11.8 टक्के आहे. लाभार्थ्यांमध्ये घटस्फोटीत, निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांचे प्रमाण हे एकत्रितपणे 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
40 लाख लाडक्या अपात्र होणार?
संजय गांधी निराधार योजना – 2 लाख 30 हजार, 65 वर्षांहून अधिक वय असलेल्या – 1 लाख 10 हजार, चार गाडी असलेल्या, नमोशक्ती योजना लाभार्थी आणि स्वेच्छेनं नाव मागे घेणाऱ्यांची संख्या – 1 लाख 60 हजार, फेब्रुवारीत छाननी प्रक्रियेनंतर अपात्र ठरलेल्या – 2 लाख, सरकारी कर्मचारी, दिव्यांगांमधून अपात्र ठरलेल्या – 2 लाख अशा लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे.