spot_img
देशएकाच घरात ४ जणांचा गळफास, कॅन्सर झाल्यामुळे टाटा स्टीलच्या मॅनेजरचा टोकाचा निर्णय

एकाच घरात ४ जणांचा गळफास, कॅन्सर झाल्यामुळे टाटा स्टीलच्या मॅनेजरचा टोकाचा निर्णय

spot_img

नगर सह्याद्री वेब टीम :
कॅन्सर झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलांसह गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आज सकाळी झारखंडमध्ये ही हृदयविदारक घटना घडली. टाटा स्टील कंपनीत सिनिअर मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या कृष्ण कुमार यांना कॅन्सर झाला होता. त्यामुळे ते नैराश्यात होते. त्यांनी दोन मुली आणि बायको यांच्यासह सामूहिक आत्महत्या केली. कृष्ण कुमार यांची सुसाइड नोट पोलिसांना मिळाली आहे. ही घटना समजताच झारखंडमध्ये खळबळ उडाली.

झारखंडमधील सरायकेला जिल्ह्यातील आदित्यपूरमधील चित्रगुप्त नगर येथे आज सकाळी एकाच घरात चार जणांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळले होते. मृतांमध्ये टाटा स्टीलचे सिनियर मॅनेजर कृष्ण कुमार (४०), त्यांची पत्नी डॉली देवी (३५) आणि त्यांच्या दोन मुलींचा समावेश आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी ही आत्महत्येची घटना असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णकुमार यांना ब्लड कॅन्सर होता. या आजारामुळे आणि कौटुंबिक कलहामुळे ते नैराशात होते. त्यामुळेच त्यांनी पत्नी आणि मुलींसह आत्महत्या केल्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाइड नोट देखील सापडली. त्यामध्ये कृष्ण कुमार यांनी आपल्या आजारपणाबरोबरच कौटुंबिक समस्यांचा आणि भविष्यात कुटुंबाचे काय होईल, याची चिंता व्यक्त केली आहे.

सामूहिक आत्महत्याच्या घटनेची माहिती मिळताच बीडीओ अभय कुमार द्विवेदी आणि आदित्यपुर पोलीस ठाण्याचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. बीडीओ यांनी कृष्ण कुमार यांच्या वडिलांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, कृष्ण कुमार टाटा स्टीलमध्ये सिनियर मॅनेजर पदावर काम करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे उघड झाले होते. डॉली यांच्या सांगण्यावरून त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी केमोथेरपीचा सल्ला दिला होता. ही सुविधा जमशेदपूरमध्येही उपलब्ध असल्याने ते परत जमशेदपूरला आले. मात्र, केमोथेरपीसाठी रुग्णालयात जाण्याआधीच ही दु:खद घटना घडली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी मंत्री थोरातांनी धाडलं थेट मंत्री विखे पाटलांना पत्र, कारण की…!

संगमनेर । नगर सहयाद्री:- भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक...

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....