spot_img
ब्रेकिंग35 लाखांचा ऐवज डोळ्यासमोर लंपास; छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील धक्कादायक प्रकार

35 लाखांचा ऐवज डोळ्यासमोर लंपास; छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील धक्कादायक प्रकार

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जेऊर टोलनाका (ता. नगर) परिसरातील पल्लवी हॉटेल जवळून आयशर वाहन व त्यातील 15 लाख रूपये किमतीचे लोखंडी पाईप व अ‍ॅल्युमिनीयमचे वायर असा 35 लाख रूपयांचा ऐवज अनोळखी व्यक्तीने लंपास केला.

शनिवारी (18 जानेवारी) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी रविवारी (19 जानेवारी) एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डोमनकुमार साहु (वय 24, रा. मोहुरीकला, जि. थमतारी, छत्तीसगड) यांनी फिर्याद दिली आहे.

ते त्यांच्या ताब्यातील आयशर वाहन (सीएस 04 पीएस 0768) मधून 15 लाख रूपये किमतीचे लोखंडी पाईप व अ‍ॅल्युमिनीयमचे वायर घेऊन जात असताना त्यांनी शनिवारी रात्री नऊच्या सुमारास वाहन जेऊर टोलनाका परिसरातील पल्लवी हॉटेल जवळ थांबविले.

फिर्यादीने तेथे स्वयंपाक बनवुन जेवण केले. त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या वाहनाची चावी जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि 20 लाख रूपयांची आयशर वाहन तसेच 15 लाख रूपयांच्या लोखंडी पाईप व अ‍ॅल्युमिनियम वायरचा माल असा 35 लाखांचा ऐवज चोरून नेला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, सदर घटनेची माहिती फिर्यादीने एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोंढे करत आहेत

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! प्रियकराच्या घराबाहेर तृतीयपंथीयाची आत्महत्या

पुणे । नगर सहयाद्री:- पुण्यातील तृतीयपंथीयाला जयपूरचा तरूण आवडला. दोघांमधले प्रेम बहरले. ते दोघेही...

नैतिकता : धनुभाऊंना नाहीच; अजितदादा तुम्हाला? धनंजय मुंडेंना किती दिवस पोसणार?, चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!

खंडणीखोर मुकादम, बेभान कार्यकर्ते, सत्तेचा माज असणारे नेते अन्‌‍ टुकार चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!सारिपाट...

ट्रक दरीत कोसळून 10 जण ठार; कुठे घडला भयंकर अपघात!

नवी दिल्ली | नगर सह्याद्री:- कर्नाटकमध्ये बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक...

महाराष्ट्राच्या हाती मोठं घबाड! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात काय-काय घडलं?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी; सव्वासहा लाख कोटींवर गुंतवणूक करार मुंबई | नगर...