spot_img
महाराष्ट्रमंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे ३ मोहरे नाराज, शिंदेंनी थेट इशाराच दिला

मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे ३ मोहरे नाराज, शिंदेंनी थेट इशाराच दिला

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
Maharashtra Cabinet Expansion : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला. नागपूरमध्ये येथे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात २१ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तर अनेक अनुभवी मंत्र्यांचा पत्ता कट्ट झाला. शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली. तानाजी सावंत आणि अर्जुन खोतकर यांनी तर अधिवेशनात न थांबण्याऐवजी मतदारसंघात माघारी परतण्याचा निर्णय झाला. शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कठोर निर्णय घेण्याचा विचार केलाय. नाराज असणाऱ्यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार नाही, असा थेट इशाराच दिलाय.

फडणवीस सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्रि‍पदाची माळ गळ्यात न पडल्यामुळे शिवसेनेच्या काही आमदारांकडून आदळआपट करण्यात आली. तानाजी सावंत आणि अर्जुन खोतकर यांनी अधिवेशनात न राहता आपल्या मतदारसंघात परतण्याचा निर्णय घेतला. अब्दुल सत्तार यांनी कॅमेऱ्यासमोर नाराज नसल्याचे सांगितले खरे पण तेही नाराज असल्याच्या चर्चेनं जोर धरलाय. दीपक सावंत यांच्या नाराजीचीही राजकीय चर्चा आहे. यावरून विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली.

आमदार तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने नाराज असल्याचे समोर आलेय. तानाजी सावंत नागपूर येथील अधिवेशन सोडून पुण्याला परतले आहेत. तानाजी सावंत बरोबर इतर आमदारही नाराज असल्याची माहिती मिळत आहे. महायुतीच्या मागील मंत्रिमंडळात तानाजी सावंत आरोग्यमंत्री होते. पण यावेळी त्यांना मंत्रिपद मिळाले नाही.

मी नाराज वगैरे काही नाही, मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य राहील. ही गोष्ट खरी आहे की शिवसेनेच्या वतीने धनुष्य बाणावर निवडणूक लढवणारा आठव्यांदा मी एकटाच आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत, ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल. कार्यकर्त्यांची भावना असते त्यांचे गेल्यावर त्यांच्याशी बोलू.

दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार नाराज असल्याच्या राजकीय चर्चेनं जोर धरलाय. दोन्ही नेत्यांकडे शिंदेंच्या सरकारमध्ये महत्त्वाची पदे होती. पण फडणवीस सरकारमध्ये या दोन अनुभवी चेहऱ्यांना नाकारण्यात आले. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू आहेत.

शिवसेनेच्या कोणत्या आमदारांना मंत्रिपद मिळाले?
1. उदय सांमत- कॅबिनेट मंत्री
2. प्रताप सरनाईक- कॅबिनेट मंत्री
3. शंभूराज देसाई- कॅबिनेट मंत्री
4. भरत गोगावले- कॅबिनेट मंत्री
5. दादा भूसे- कॅबिनेट मंत्री
6. प्रकाश आबिटकर- कॅबिनेट मंत्री
7. गुलाबराव पाटील- कॅबिनेट मंत्री
8. संजय राठोड- कॅबिनेट मंत्री
9. संजय शिरसाट – कॅबिनेट मंत्री
10. योगश कदम- राज्यमंत्री
11. आशिष जयस्वाल- राज्यमंत्री

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...