spot_img
अहमदनगर२७ वर्षांच्या अस्लमचे १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत 'तसले' कृत्य! सावेडीतील 'कॉफी' हाऊस...

२७ वर्षांच्या अस्लमचे १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत ‘तसले’ कृत्य! सावेडीतील ‘कॉफी’ हाऊस मध्ये नेमकं घडलं काय?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
२७ वर्षांच्या एका तरुणाने अल्पवयीन मुलीला मोबाईलवर मेसेज पाठवून धमकी देऊन बळजबरीने तिचा विनयभंग केला. सदरची घटना 7 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास सावेडीतील एका कॅफे हाऊसमध्ये घडली. याप्रकरणी अस्लम फकिरमहंमद सय्यद (वय 27, रा. केडगाव वेशीजवळ, केडगाव) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी: 6 रोजी सायंकाळी साडेसात वाजता फिर्यादी घरी अभ्यास करत असताना आरोपीने मोबाईलवर मेसेज करून धमकी दिली, तुला यावेच लागेल, नाहीतर बघ मी काय करतो? धमकीमुळे फिर्यादी घाबरून गेली आणि हो म्हणाली. त्यानंतर 7 रोजी सकाळी साडेअकराच्या फिर्यादी आरोपीला भेटण्यासाठी त्याच्या अस्लम मोबाईल अ‍ॅॅण्ड रिपेअरिंग शॉपी दुकानाजवळ गेली असता, आरोपीने फिर्यादीला 20 रुपये दिले आणि म्हणाला, तू रिक्षाने कायनेटीक चौक येथे जाऊन थांब मी तेथे लगेच येतो.

त्यानंतर दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आरोपी हा त्याची मोपेड दुचाकी घेऊन कायनेटीक चौक येथे आला. फिर्यादीला त्याच्या मोपेडवर बसवून सावेडीतील एका कॅफे हाऊस येथे फिर्यादीची इच्छा नसताना घेऊन गेला. तेथे त्याने फिर्यादीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सपोनि विकास काळे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...