अहिल्यानगर । नगर सहयाद्री
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. कारवाईत ३ आरोपींना अटक केली असून ३३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. फिरोज रशिद शेख, लाला ऊर्फ अफताब हरुन शेख दोघे (रा. घोडेगाव, ता. नेवासा), शुभम बाबासाहेब पुंड (रा. माळी चिंचोरा, ता. नेवासा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून भारत भाऊसाहेब शहाराव (रा. फत्तेपुर, ता. नेवासा) जुनेद शेख (पूर्ण नाव अज्ञात, रा. मुंगी, ता. शेवगाव) हे आरोपी पसार झाले आहे.
शुक्रवार दि. १२ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोडेगाव शिवारातील शेख वस्ती येथे काही जण जनावरे ट्रकमध्ये भरून कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार तातडीने तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. घटनास्थळी छापा टाकताच काही इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पाठलाग करून तीन आरोपींना अटक करण्यात आली.
पथकाने १३ लाख रुपये किंमतीचे २६ जिवंत गोवंशीय जनावरे, २० लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा ट्रक असा एकूण ३३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पो.ना. सोमनाथ झांबरे यांनी फिर्याद दिली असून, सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार पोनि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकातील सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, ऱ्हदय घोडके, लक्ष्मण खोकले, गणेश लोंढे, संतोष खैरे, सुयोग सुपेकर, सोमनाथ झांबरे, शामसुंदर जाधव, भिमराज खर्से, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, जालिंदर माने, प्रमोद जाधव, उमाकांत गावडे, अरुण मोरे, सारिका दरेकर, सुवर्णा गोडसे यांच्या पथकाने केली आहे