spot_img
महाराष्ट्रमहाराष्ट्रात भाजपाचे २३ उमेदवार जाहीर ! पाच खासदारांचा पत्ता कट, पहा कुणाला...

महाराष्ट्रात भाजपाचे २३ उमेदवार जाहीर ! पाच खासदारांचा पत्ता कट, पहा कुणाला कोठे मिळाले तिकीट

spot_img

नवी दिल्ली / नगर सह्याद्री : महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे अशी पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. भाजपाने देशपातळीवर पाच याद्या जाहीर केल्या आहेत. त्यातली दुसरी यादी आणि पाचवी यादी यामध्ये महाराष्ट्रातले २३ उमेदवार जाहीर झाले आहेत. भाजपाने २०१९ मध्ये २३ जागा जिंकल्या होत्या. त्यानुसार भाजपाने २३ उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपाने आत्तापर्यंत जी २३ नावं जाहीर केली आहेत त्यानुसार पाच विद्यमान खासदारांची तिकिटं कापण्यात आली आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार मनोज कोटक, जळगवाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना भाजपाने तिकिट दिलेलं नाही. तर सोलापुरात जयसिद्धेश्वर स्वामी हे भाजपाचे खासदार आहेत. त्यांच्याऐवजी राम सातपुतेंना तिकिट देण्यात आलं आहे.

खासदारांची लिस्ट
१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड – पंकजा मुंडे
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे

९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव- स्मिता वाघ
१५) दिंडोरी- भारती पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८) नागपूर- नितीन गडकरी
१९) अकोला- अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित
२१) सोलापूर – राम सातपुते
२२) भंडारा गोंदिया – सुनील मेंढे
23) गडचिरोली चिमूर – अशोक नेते

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...