Naxalite encounter : छत्तीसगडमधील बिजापूर आणि कांकेरमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत एकूण २२ नक्षलवादी ठार झाले. बिजापूर-दंतेवाडा सीमेवरील गंगलूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जंगलात झालेल्या चकमकीत १८ नक्षलवादी ठार झाल्याचे बिजापूर पोलिसांनी सांगितले. तर कांकेरमध्ये चार नक्षलवादी मारले गेले. मात्र, यामध्ये एक सैनिकही शहीद झाला. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी याची पुष्टी केली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कारवाईदरम्यान, गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू होता. ही चकमक विजापूरच्या गंगलूर भागातील आंद्रीच्या जंगलात घडली. एसपी जितेंद्र यादव म्हणाले की, चकमक अजूनही सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांचे संयुक्त पथक गंगलूर पोलिस स्टेशन परिसरात नक्षलविरोधी कारवाईवर असताना ही चकमक सुरू झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिसरात अजूनही अधूनमधून गोळीबार सुरू आहे. या संदर्भात अधिक माहिती गोळा केली जात आहे.
खरं तर, डीआरजी, एसटीएफ आणि सीआरपीएफची संयुक्त टीम बिजापूर आणि दंतेवाडा सीमावर्ती भागातील गंगलोर पोलिस स्टेशन अंतर्गत नक्षलविरोधी कारवाईसाठी निघाली होती. या कारवाईदरम्यान, गुरुवारी सकाळी माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू होता, त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू असताना, चकमकीच्या ठिकाणी दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. या चकमकीत विजापूर डीआरजीचा एक जवानही शहीद झाला.