spot_img
ब्रेकिंग११ गावांसह २१ वाड्यांना मिळणार पाणी; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती

११ गावांसह २१ वाड्यांना मिळणार पाणी; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती

spot_img

संगमनेर | नगर सह्याद्री
अकोले तालुयातील पिंपळगाव खांड धरणातून संगमनेर तालुयातील पठार भागातील जवळे बाळेश्वरसह ११ गावे आणि २१ वाड्यांना पाणीपुरवठा करता यावा यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. या संदर्भातील वरिष्ठ अधिकार्‍यांची समिती नेमण्यात येणार असून, त्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील मरॉयल स्टोनफ निवासस्थानी श्री बाळेश्वर संयुक्त पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या शिष्टमंडळाने मंत्री विखे पाटील यांची भेट घेतली. शिष्टमंडळात सावरगाव घुलेचे सरपंच नामदेव घुले, डोळासणेंचे उपसरपंच बाळासाहेब काकड, पिंपळगाव देप्याचे माजी उपसरपंच पांडुरंग गुंड, अर्जुन घुले, तसेच पत्रकार गोरक्षनाथ मदने यांचा समावेश होता.

पठार भाग हा पर्जन्यछायेत येणारा अवर्षणप्रवण भाग असल्याने येथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे १९७२ पासून शासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत ११ गावांसाठी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला २०२२ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली असून, २०२३ मध्ये कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

सध्या या योजनेच्या अनेक गावातील पिण्याच्या पाण्याच्या मनोरा आणि बैठक टायांची कामे झाली आहेत. त्याचबरोबर गाव अंतर्गत आणि वाड्या अंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी आवश्यक असलेल्या अंतर्गत पाईपलाईनही पूर्णत्वास गेल्या आहेत. पिंपळगाव खांड ते या योजनेतील गावे साधारण २३ किलोमीटर अंतरावर एक फुटाचा व्यास असलेल्या मेन पाईपलाईनद्वारे हे पाणी येण्याचे प्रस्तवित आहे. सध्या या योजनेचे काम अकोले तालुयातील लिंगदेव पर्यंत पूर्णत्वास गेले आहे. उर्वरित लिंगदेव ते पिंपळगाव खांड या चार किलोमीटरच्या अंतरात हे काम स्थानिक शेतकर्‍यांच्या अडवणुकीमुळे रखडले असल्याची बाब मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिली.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यातून तोडगा काढावा आणि पठारावरील जनतेला पिण्याचे पाणी द्यावे यासाठी या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांचे याकडे लक्ष वेधले. त्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पिंपळगाव खांड धरणात अतिरिक्त पाणीसाठा कसा निर्माण करण्यात येईल यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांची समिती नेमून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर समतोल राखत योग्य पर्याय निवडून पाणी देण्याची व्यवस्था करू असे आश्वासन दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरचे माफिया राज रोखण्यासाठी निवडणूकीत महायुतीला पाठबळ द्या : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

निघोज / प्रतिनिधी रेडबुलचा वापर करुण पारनेरचा माफियाराज माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दादागीरीला सामोरे जावे लागत...

अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

कोल्हापूर / नगर सह्याद्री : राज्य पातळीवर शरद पवार आणि अजित पवार गट वेगवेगळे असले...

निवडणुकीची रणधुमाळी! उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात; आघाडी-युतीचे तळ्यात मळ्यात

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पालिकांसाठी हालचाली  अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील 12 पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला...

अरणगाव शिवारात दोन गटात राडा; लोखंडी गज, काठीने मारहाण, वाचा प्रकरण?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील शिंदे मळा परिसरात दोन गटात शेतीच्या...