spot_img
अहमदनगरपारनेरमध्ये २०१४ चा श्रीगोंदा पॅटर्न; पवार-विखे यांनी केले सूचक विधान... 

पारनेरमध्ये २०१४ चा श्रीगोंदा पॅटर्न; पवार-विखे यांनी केले सूचक विधान… 

spot_img

 

उपमुख्यमंत्री अजित पवार | अपक्ष उमेदवार विजय औटी यांचे शक्तीप्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते यांना भाळवणीच्या सभेत जाहीर पाठिंबा

पारनेर | नगर सह्याद्री-
राज्यात सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जात आहेत. प्रत्येक घटकाला न्याय देण्याची आमची भूमिका आहे. महायुतीबद्दल विरोधकांकडून चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघात अनेक जण इच्छुक होते. परंतु गेल्या ४० वर्षापासून तालुयाच्या राजकारणात व समाजकारणात सक्रिय असलेले काशिनाथ दाते यांना उमेदवारी आम्ही दिली आहे. श्रीगोंद्यातील २०१४ चा पॅटर्न आता पारनेरमध्ये राबविला असल्याने महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांचा विजय निश्चित असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, अपक्ष उमेदवार विजय औटी यांनी दाते यांना पाठिंबा दिल्यामुळे दाते यांची ताकद वाढली असल्याचे ते म्हणाले.
महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्या प्रचारार्थ भाळवणी येथील बाजार तळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी विजय औटी यांच्यावर बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले विजुभाऊ तुम्ही किती अडचणीत आहात हे मला माहीत आहे. तुम्हाला कोणी अडचणीत आणले, त्रास दिला हे आम्हाला माहीत आहे. निवडणूक होऊ द्या निकाल लागू द्या मग पाहू. श्रीगोंदा मतदारसंघात २०१४ मध्ये आमदार बबनराव पाचपुतेंचा पराभव करण्यासाठी सर्व नेत्यांना एकत्रित करण्यात आले होते. त्यामुळे राहुल जगताप यांचा विजय झाला होता. आता तोच पॅटर्न श्रीगोंद्यात राबविला असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

यावेळी उमेदवार काशीनाथ दाते, सुजित झावरे पाटील, माजी नगराध्यक्ष विजय औटी, राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाळासाहेब नाहाटा, मधुकर उचाळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाजप प्रदेश सदस्य विश्वनाथ कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेश अध्यक्ष संध्या सोनवणे, जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पारनेर तालुका अध्यक्ष विक्रम कळमकर, भाजपा तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, सचिन पाटील वराळ, लाडकी बहीण योजना समिती तालुका अध्यक्ष सुनिल थोरात, माजी सभापती गणेश शेळके, माजी सभापती आरुण ठाणगे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, सरपंच पंकज करखिले, सरपंच मनोज मुंगसे, सरपंच लहू भालेकर, उपसरपंच शंकर बर्वे, सुभाष दुधाडे, सुभाष सासवडे, नगरसेवक पै. युवराज पठारे, दत्तानाना पवार, रिपाई तालुका अध्यक्ष राजेंद्र उबाळे, युवराज पाटील, सागर मैड, संग्राम पावडे, सुषमा रावडे, सोनाली सालके, वैशाली कर्नावट, किसन धुमाळ, दिलीप दाते, किरण कोकाटे, संतोष शेलार, विकास रोकडे, शिवाजी रोकडे, प्रसाद कर्नावट, अशोक चेडे, निवृत्ती वरखडे, कैलास नर्‍हे, वैभव नरसाळे, शेखर काशीद, सिध्दांत आंधळे, सतिश गायकवाड, आधी राष्ट्रवादी भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी विजुभाऊ औटी व काशिनाथ दाते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारनेरमधील दहशत संपविण्यासाठी
दातेंच्या पाठीशी उभे रहा ः डॉ. विखे
पारनेर तालुयाची दडपशाही संपवण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील काशिनाथ दाते यांच्या पाठीशी पारनेरकरांनी उभे राहिले पाहिजे. लोकसभेला घराणेशाहीचा माझ्या विरोधात प्रचार झाला. ती घराणेशाही होती तर आता पारनेरमध्ये एकाच घरात दोन्ही उमेदवारी आहेत. हे काय आहे. असा सवाल करत निवडणूक सर्वसामान्यांच्या अस्तित्वासाठीची व लोकतंत्र वाचवण्यासाठी आहे. सर्वांनी एकत्र येऊन महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

भाळवणीतील सभा
ठरणार टर्निंग पॉइंट!
महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्या यांच्या प्रचारार्थ भाळवणी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. या सभेला मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. सभेमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. अपक्ष उमेदवार, मधुकर उचाळे, सुजित झावरे आदी नेते व्यासपीठावर उपस्थित होते. पारनेरकर दाते यांना निवडून आणण्यासाठी सक्रिय झाले असल्याने भाळवणी येथील सभा ही पारनेर विधानसभा निवडणूकमध्ये काशिनाथ दाते यांच्या विजयासाठी टर्निंग पॉईंट ठरण्याची शयता असल्याचे बोलले जात आहे.

दाते-लंके-कार्ले यांच्यात चुरस
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांना माजी नगराध्यक्ष अपक्ष उमेदवार विजय औटी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. पाठिंबा देण्यापूर्वी औटी यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. सुरुवातीला पंचरंगी दिसत असलेली पारनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात आता तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. औटी यांच्या पाठिंब्यामुळे दाते यांची ताकद वाढली असल्याचे बोलले जात आहे.

विजय औटी यांचा पाच हजार
युवकांच्या उपस्थितीत पाठिंबा
महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार काशिनाथ दाते यांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. भाळवणी येथील सभेनंतर तालुयातील राजकारणाला कलाटणी मिळण्याची शयता आहे. अपक्ष निवडणुकीत उतरलेले पारनेर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत पाच हजार युवकांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार व सुजय विखे पाटील यांच्या शब्दाला प्रमाण मानून राष्ट्रवादीचे उमेदवार काशिनाथ दाते यांना भाळवणी येथील प्रचारसभेत पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दाते यांची ताकद वाढली असल्याचे बोलले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सत्तरीतील वाघाचं सोमवारी आमदारीकीतील शेवटचं भाषण!; पाचपुते काय बोलतात याकडे लागले सर्वांचेच लक्ष

  काष्टीच्या भैरवनाथ चौकात बबनराव पाचपुते यांची जाहीर सभा श्रीगोंदा / नगर सह्याद्री - बबनराव पाचपुते! वय...

झुंडशाही अन् दबंगगीरीने गावागावात कलह; तुम्हीच ठरवा, एकाधिकारशाही हवी की लोकशाही, काशिनाथ दाते काय म्हणाले…

मतदारसंघात विकास कामांच्या जोडीने शांतता नांदावी, द्वेष-मत्सर कमी व्हावा आणि सलोख्याचे वातावरण कायम राहण्याची...

पडद्यामागील सुत्रधार राजेंद्र नागवडेंना आरोपी करा!; काय आहे प्रकरण पहा…

पारनेरमधील राजेशिवाजी, गोरेश्वर या पतसंस्थांमधील बोगव कर्जवितरणातून ठगविणारा पोपट ढवळे हा फक्त प्यादा! /...

कर्डिलेंचा तनपुरेंवर हल्लाबोल; त्यावेळी का बोलले नाही… काय म्हणाले पहा…

कोरोना काळासह त्यानंतर दूध अनुदानाबाबत का बोलले नाही अन् अनुदान का दिले नाही? दूधभावाचा...