spot_img
अहमदनगर‘गोगलगाय’च्या नावाखाली २० कोटींचा गफला!

‘गोगलगाय’च्या नावाखाली २० कोटींचा गफला!

spot_img

किरकोळ बाजारात २२५ रुपये प्रतिकिलो दराने मिळणारे किटकनाशक खरेदी केले १ हजार २७५ रुपये प्रतिकिलोने! देवेंद्रजी, तुम्हीच सांगा का द्यावी शेतकर्‍यांनी तुम्हाला मते? | दुथडे-पाटील-पिंगटे ‘त्रिकुटा’ला गोगलगाय ‘पावली’!

ऑन दी स्पॉट रिपोर्ट (भाग क्र -३) |  शिवाजी शिर्के

सोलापूरच्या ‘पालिवाल माहेश्वरी’वर मेहेरबान झालेले धनंजय मुंडे यांचे कृषी खाते आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकर्‍यांसाठीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातील डीबीटी धोरणाला छेद देत २६४ कोटी रुपयांची लुट करणार्‍या टोळीने २० कोटी रुपयांचा आणखी मोठा गफला केल्याचे समोर आले आहे. पिकांवर शंखी गोगलगाय या किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने ही किड मारण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेटाडिहाईड हे किटकनाशक खरेदी करण्यात आले. हे किटकनाशक किरकोळय बाजारात २२५ रुपये प्रतिकिलो या दराने उपलब्ध असताना पाच पट वाढीने म्हणजेच १ हजार २७५ रुपये प्रतिकिलो या दराने खरेदी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासाठी जवळपास २५ कोटी रुपयांची खरेदी दाखविण्यात आली. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार शंखी गोगलगाय ही कीड जवळपास संपुष्टात आली असून त्याचा प्रादुर्भाव देखील कमी झाला आहे. मग, असे असताना ही २५ कोटी रुपयांची खरेदी झाली. यात शेतकर्‍यांपेक्षा पुरवठादाराचे हित पाहिले गेले आणि सरकारी तिजोरीवर दरोडा टाकला गेला. कृषी विभागाशी निगडीत असणार्‍या विभागात दुथडे- पाटील- पिंगटे या त्रिकुटाला हीच गोगलगाय तब्बल वीस कोटींना पावली अन् मालामाल करुन गेली. लोकसभा निवडणुकीत शेतकर्‍यांच्या रोषाचा सामना करावा लागलेल्या महायुती सरकारला आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाला शेतकर्‍यांनी याच घोटाळेबाजांमुळे नाकारले! आता येत्या निवडणुकीत कोणत्या कारणाने शेतकर्‍यांनी भाजपा व मित्रपक्षांना मते द्यायची हे आता देवेंद्र फडणवीस यांनीच कृतीतून दाखवून देण्याची गरज आहे.

शंखी गोगलगाय प्रादर्भाव रोखण्यासाठी मेटाडिहाईड किटकनाशक वापरले जाते. सदर किटकनाशक खरेदी करताना ई निवीदा काढण्यात आली. मेटालडिहाईड हे किटकनाशक हानीकारक असून कृषी विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार सदर उत्पादन हे मित्र किटकांना हानीकारक असून त्याचा वापर अयोग्य आहे. तथापी कृषी उद्योग विकास महामंडळाने मेटालडिहाइड या किटकनाशकाची ई निवीदा केली. २५ कोटी रकमेची यातून खरेदी केली. सदर ई निवीदेत उत्पादन करणारी कंपनी पेस्टीसाईड इंडिया या एकमेव कंपनीकडून थेट खरेदी करणे आवश्यक असताना तसे केले नाही. सदर किटकनाशकाची खरेदी वितरकामार्फत संगनमताने केली गेली.

यासाठी मेसर्स स्टार फर्टीलायझर्स अँड पेस्टीसाईड, सोलापूर या नव्याने सुरू झालेल्या कंपनीकडून खरेदी करण्यात आले. मेटालडिहाइड किटकनाशकाची एमआरपी म्हणजेच प्रति किलो किंमत १२७५/- रुपये असून महामंडळाने ते त्याच दराने खरेदी केले आणि शासनाला दिले. वास्तविक ऑनलाईन अ‍ॅग्रो स्टार या कंपनीकडून दि. ४ जून २०२४ रोजी एका शेतकर्‍याने खरेदी केले असता ते २२५ रुपये प्रति किलो या दराने दिले गेले. सदर खरेदी मागे एक हजार रुपये प्रतिकिलो या प्रमाणे स्टार फर्टीलायझर अँड पेस्टीसाईड, सोलापूर या सुरज झांबरे यांच्या कंपनीला जवळपास वीस कोटी रुपये मिळाले. सदर खरेदी करताना शासकीय पातळीवर मोठी गडबड झाली.

शेतकर्‍याला जर २२५ रुपये किलो प्रमाणे हेच किटकनाशक मिळत असेल तर शासनाला हेच किटकनाशक १२७५ रुपये किलोने कसे? जवळपास वीस कोटी रुपयांचा गफला शंखी गोगलगायच्या नावाखाली झालाय! हेेच वीस कोटी जर शेतकर्‍यांना विकल्या जाणार्‍या दराने खरेदी झाली असती तर लाभार्थी शेतकर्‍यांची संख्या वाढली असती. मात्र, देवानंद दुथडे (किटकनाशके विभागाचे उपमहाव्यवस्थापक) आणि सुजित पाटील (फायनान्स) हेमंत पिंगटे (व्यवस्थापक, किटकनाशक) या त्रिकुटाने यात ‘बार्‍या’ लावल्या अन् पुरवठादारांच्या घशात हा मलिदा घातला.

गोगलगाय प्रादुर्भाव दरवर्षी होतच नाही. वास्तविक त्या किटकनाशकाची गरजच नसल्याचा स्पष्ट अभिप्राय कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी दिला आहे.असताना कृषी उद्योग महामंडळ आणि कृषी विभागातील दुथडे- पाटील- पिंगटे यांना हीच गोगलगाय हवी असते आणि तिच्या नावाखालील मिळणारा कोट्यावधी रुपयांचा मलिदा देखील!
(क्रमश:)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...