चोंभूतच्या गौतमनगरमध्ये साकारली जाणार चैत्यभूमीच्या कमानीची प्रतिकृती: प्रणल भालेराव 
पारनेर | नगर सहयाद्री 
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने’अंतर्गत मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून चोंभूत ग्रामपंचायतीमधील गौतमनगर येथे भव्य स्वागत कमान उभारण्यासाठी २० लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. 
यामुळे स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. ग्रामपंचायत सदस्य प्रणल पोपट भालेराव यांनी गौतमनगर येथे आकर्षक स्वागत कमान उभारण्याची मागणी आमदार काशिनाथ दाते सर यांच्याकडे केली होती. या मागणीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आमदार दाते यांनी स्थानिकांच्या अपेक्षांची दखल घेत २० लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला. ही कमान केवळ वास्तू न राहता, परिसराच्या सौंदर्यात भर घालणारी ओळख ठरणार आहे. या निर्णयाबद्दल गणेश भालेराव, राजू भालेराव, संगम भालेराव, किसन गुंजाळ, स्वप्नील भालेराव, अजित भालेराव, विशाल भालेराव, सचिन भालेराव, दीपक भालेराव, संजय भालेराव, मंगेश भालेराव, अक्षय भालेराव, दगडू भालेराव, सागर सोनवणे, संकेत भालेराव, सनी भालेराव, संतोष भालेराव, निखिल भालेराव, योगेश भालेराव आदींसह परिसरातील सर्व नागरिकांनी आमदार दाते सर यांचे आभार मानले.
सर्वांगीण विकास आमचे ध्येय
माझ्या मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाडी आणि वस्तीचा समतोल विकास हेच माझे ध्येय आहे. सामाजिक न्याय विभागाच्या या योजनेतून केवळ गौतमनगरचे नव्हे, तर अनेक वंचित भागांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे.
आ. काशिनाथ दाते,
चैत्यभूमीच्या कमानीची संकल्पना
गौतमनगर येथील स्वागत कमान मुंबईतील चैत्यभूमीच्या कमानीच्या प्रतिकृतीवर आधारित असणार आहे. “ही कमान समता, न्याय आणि प्रेरणेचे प्रतीक ठरेल,” असा विश्वास निधी मंजूर होताच ग्राम. सदस्य प्रणल भालेराव यांनी व्यक्त केला.
अळकुटी गटात विकासकामांना गती : भास्करराव उचाळे
आमदार काशिनाथ दाते सर यांनी चोंभूतसारख्या छोट्या गावात स्वागत कमानीसाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, पुढील तीन महिन्यांत काम पूर्ण होईल. दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणारे आमदार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पारनेर तालुकाध्यक्ष भास्करराव उचाळे यांनी सांगितले.
अळकुटी गट विकासाभिमुख होणार : आर. एम. कापसे
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागली आहेत. पुढील काही वर्षांत या गटाचा विकासाभिमुख गट म्हणून नावलौकिक वाढेल,”असे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आर. एम. कापसे सर यांनी सांगितले.



 
                                    
