शेवगाव । नगर सहयाद्री:-
शेअर मार्केटमध्ये दोन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या गणेश बाळासाहेब उर्फ बाळकृष्ण कुलट याला शेवगाव पोलीसांनी मित्रांसोबत नशेत बिर्याणी पार्टी करत असताना अटक केली. १२ ऑगस्ट रोजी बबन शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून सीडीजी इनव्हेस्टमेंट शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. दोन्ही पोलीस पथक गंगापूर आणि पैठण येथे रवाना करण्यात आले. आरोपी कुलट आणि त्याचे मित्र गंगापूर ते येवला रोडच्या बाजूला बिर्याणी पार्टी करत असताना पोलीस पथकाने त्यांना सापळा लावून ताब्यात घेतले.
सदरची कारवाईत ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक भदाणे, सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, हवालदार परशुराम नाकाडे, शाम गुंजाळ, संतोष वाघ, बाप्पासाहेब धाकतोडे, संपत खेडकर, राहुल खेडकर तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे नितीन शिंदे, राहुल गुड्डू यांनी केली. पुढील तपास गुन्ह्यांचा तपास धरमसिंग सुंदरडे करत आहेत.