spot_img
महाराष्ट्र'खुनाचा प्रयत्न करणारे २ आरोपी जेरबंद'

‘खुनाचा प्रयत्न करणारे २ आरोपी जेरबंद’

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
चांदगांव, ता. शेवगांव येथील शेतातील रस्त्याच्या कारणावरून खुनाचा प्रयत्न करणारे २ आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकजय पथकाने जेरबंद केले आहे. महादेव अंकुश गायके ( वय २०) गणेश जालींदर गायके (वय १९) दोन्ही (रा. बेलगांव, ता. शेवगांव) असे आरोपीचे नाव आहे.

दिनांक १३ जुलै, २०२४ रोजी फिर्यादी गोपीचंद अश्रु पोपळे (वय ६५, रा. बेलगांव, ता. शेवगांव) हे त्यांची पत्नी व मुलगा यांच्यासोबत शेतात रस्त्याची दुरुस्ती करत होते. यावेळी रामदास गायके व इतर ५ इसमांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांवर हातातील कुऱ्हाड, लाकडी दांडके, काठ्या व कोयता वापरून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत शेवगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

त्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. या आदेशान्वये पोनि दिनेश आहेर यांनी पोउपनि तुषार धाकराव, पोहेकॉ संतोष लोढे, पोना फुरकान शेख, पोकों रविंद्र घुगांसे, जालिंदर माने, मयुर गायकवाड व पोहेकों उध्दव टेकाळे यांचे पथक तयार केले.

दिनांक ०२ ऑगस्ट २०२४ रोजी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी महादेव गायके व गणेश गायके हे पाथर्डी तालुक्यातील वृध्देश्वर कारखाना परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ कारखाना परिसरात जाऊन आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींनी मारहाणीची कबुली दिल्यानंतर त्यांना शेवगांव पोलीस स्टेशनला हजर केले गेले. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हे घ्या पुरावा! राज ठाकरेंनी आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला…, कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीच्या आरोपासंदर्भात निडणूक आयोगाला...

विधानसभेची मतदारयादी स्थानिक स्वराज्य संस्थेला नको ; बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले पहा

संगमनेर / नगर सह्याद्री - “राहुल गांधी यांनी मतचोरी होत असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर...

संजय काका, काळजी घ्या! आदित्य ठाकरेंची पोस्ट; नेमकं काय लिहिलं?

मुंबई । नगर सहयाद्री:- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड झालीये....