spot_img
देशकाँग्रेसला पुन्हा झटका! लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बजावली १७०० कोटींची नोटीस, नेमकं प्रकरण...

काँग्रेसला पुन्हा झटका! लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बजावली १७०० कोटींची नोटीस, नेमकं प्रकरण काय?

spot_img

Income Tax Notice: ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसला पुन्हा झटका बसला आहे. आयकर विभागाने काँग्रेसला तब्बल १७०० कोटी रुपयांची नवी नोटीस बजावली आहे. २०१७-१८ ते २०२०-२१ पर्यंतच्या कालावधीतील पेनल्टी व व्याजाची थकीत रक्कम भरण्यासाठी आयकर विभागाने ही नोटीस पाठवली आहे.

यापूर्वी देखील आयकर विभागाने काँग्रेसला नोटीस पाठवली होती. थकीत रक्कम न भरल्यामुळे आयकर विभागाने काँग्रेसला दंडही ठोठावला होता. यासोबत काँग्रेसची बँक खाते देखील गोठवण्यात आली होती. आयकर विभागाच्या या कारवाईविरोधात काँग्रेसने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.मात्र, या प्रकरणावर सुनावणी घेताना उच्च न्यायालयाने काँग्रेसला दिलासा देण्यास नकार दिला. न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठाने काँग्रेस पक्षाची याचिका फेटाळून लावली.

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताच आयकर विभागाने काँग्रेसला नवीन नोटीस बजावली आहे.२०१७-१८ ते २०२०-२१ पर्यंतच्या कालावधीतील पेनल्टी व व्याजाची थकीत रक्कम भरण्याचे आयकर विभागाने सांगितले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला दुहेरी झटका बसला असून अडचणीत वाढ झाली आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांची गळचेपी केली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांवर अशा प्रकारे कारवाया करणे लोकशाहीसाठी घातक असल्याचं काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि वकील विवेक तन्खा यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेस पक्ष आयकर विभागाच्या या नोटीसीला कायदेशीर मार्गाने उत्तर देईल आणि पाठपुरावा करेल, असं तन्खा यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रारूप प्रभाग रचनेवर ठाकरे शिवसेना हरकती घेणार : शहरप्रमुख काळे

इच्छुकांची चाचपणी सुरू, आघाडी बाबत योग्य वेळी निर्णय घेऊ अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर...

बिबट्याच्या हल्ल्यात पारनेर तालुक्यात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

  कळस परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी गणेश जगदाळे / नगर सह्याद्री : पारनेर...

सरकार झुकलं! मागण्या मान्य पण जरांगे पाटलांनी पुन्हा सरकारला दिला ‘हा’ इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - मनोज जरांगे यांच्या मागण्याचा सरकारकडून जीआर काढण्यात आला आहे....

पानटपरीवर गॅंगवार; कोयत्याने सपासप वार! शहरात गुन्हेगारांचा कहर, चाललंय काय?, वाचा सविस्तर..

Ahilyanagar Crime News: पानटपरीवर बसलेल्या युवकावर दहा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. मित्राचे भांडण...