अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
निंबळक शिवारातील रेल्वे ट्र्कवरील अपघातात १६ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. वैष्णवी विजय पुजारे (वय १६, रा. निंबळक शाळेजवळ, जि. अहिल्यानगर) असे मयत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदरची घटना १० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी घडली. अपघातानंतर वैष्णवी हिला गंभीर अवस्थेत सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन शिंदे यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती तोफखाना पोलीस ठाण्यातील पोहेकॉ साठे यांनी अहवालाद्वारे एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानंतर रात्री गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील सपोनि चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोहेकॉ जाधव करत आहे.