spot_img
ब्रेकिंगबारावीच्या विद्यार्थ्यांची गाडी पलटली; कुठे घडला अपघात?

बारावीच्या विद्यार्थ्यांची गाडी पलटली; कुठे घडला अपघात?

spot_img

छ. संभाजीनगर | नगर सह्याद्री
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात 12वी बोर्डाच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे . वैजापूरच्या खंडाळ्याजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाल्याने मोठा अपघात झाला असून 5 विद्याथ जखमी झाले आहेत. या पाच विद्यार्थ्यांपैकी एक तरुण गंभीर जखमी असून इतर चारही जखमी विद्याथ बोर्डाच्या पेपरसाठी हजर राहिले. जखमी तरुणाला तातडीने वैजापूरचा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा राज्यभरात आजपासून (11 फेब्रुवारी) सुरू झाली. सकाळी 11 वाजता राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर बारावी बोर्डाच्या पहिल्या पेपरला सुरुवात झाली .दरम्यान छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर तालुक्यात परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

बारावी बोर्डाच्या परीक्षेला घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरजवळ अपघात झाला .गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली .सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही मात्र 5 विद्याथ जखमी झाले . या विद्यार्थ्यांमध्ये एकाची प्रकृती गंभीर असून इतर चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे . जखमी तरुणाला वैजापूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . सुदैवाने इतर चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली.

अपघातानंतर किरकोळ दुखापत झालेल्या चार विद्याथ बोर्डाच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर पोहोचले . बारावी परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. संपूर्ण वर्षभर कष्ट घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस निर्णायक असतो. मात्र, खंडाळा गावातील या 5 विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रापर्यंतचा प्रवास अत्यंत धोकादायक ठरला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली आणि विद्याथ जखमी झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...