spot_img
अहमदनगरनगरकरांना खुशखबर! 'या' तीन उड्डाणपूलासाठी १२५ कोटी मंजूर

नगरकरांना खुशखबर! ‘या’ तीन उड्डाणपूलासाठी १२५ कोटी मंजूर

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याने शहरात आणखी ३ उड्डाणपूल मंजूर झाले आहेत. नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पोलीस अधीक्षक कार्यालय चौक, तसेच नगर मनमाड महामार्गावरील नागापूर येथील सन फार्मा चौक व याच रस्त्यावरील सह्याद्री चौक अशा तीन नव्या उड्डाण पुलांसाठी १२५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

या तीन नव्या उड्डाण पुलांमुळे मनमाड रोड व छत्रपती संभाजीनगर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे. नगर-मनमाड रस्त्यावरील डिएसपी चौक नगर येथे उड्डाणपुलाच्या बांधकामास ७ कोटी रुपयांचा निधी, तसेच या रस्त्यावरील सह्याद्री चौक आणि सन फार्मा चौक येथे देखील दपदरी उड्डाणपुलाच्या बांधकामास ५२ कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती खा.डॉ. विखे पाटील यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या निधीमध्ये नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम, सेवा रस्ता व पोहोच मार्गाचे बांधकाम तसेच संकीर्णबाबी आदी गोष्टींचा समावेश असेल. या नगर-मनमाड हायवेवर उड्डाणपुलाची निर्मिती होणे ही काळाची गरज होती. शहरात प्रवेश करताना सन फार्मा, सह्याद्री चौक आणि डिएसपी चौक येथे प्रचंड ट्रॅफिक निर्माण होत होती. त्यामुळे उसळणारी बाहनांची गर्दी ही डोकेदुखी ठरत होती.

तातडीच्या कामांसाठीजाणाऱ्या किंवा येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. हे ओळखून याठिकाणी उड्डाणपूल व्हावा, अशी इच्छा होती. त्यासाठी वेळोवेळी योग्य तो पाठपुरावा देखील पालकमंत्री व माझ्याबतीने सुरू होता. अखेरीस याबाबतचा शासन निर्णय झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...