Ahmednagar Crime: श्रीगोंदा तालुयातील काष्टीच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या होस्टेलवर राहत असलेल्या विद्यार्थ्यांना बेकायदा व्याजाने दिलेल्या पैशाची मागणी करत तरुणांच्या डोयाला गावठी कट्टा लावून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार खासगी सावकाराने केला. याप्रकरणी सौरभ विजय सुरवसे (खरवंडी, ता नेवासा) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार खाजगी सावकार वैभव सुभाष चौधरी याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सौरभ सुरवसेचा मित्र अथर्व दातीर याला १ लाख रुपयांची आवश्यकता होती. फिर्यादी यांनी वैभव चौधरीकडून एक लाख रुपये घेतले होते. पैशाला खाजगी सावकार चौधरी यांने दिवसाला बारा हजार व्याज लावले. त्यानंतर काही दिवसांनी वैभव चौधरी याने इंजिनियरिंग कॉलेजचे होस्टेल गाठत सौरभ सुरवसे, अथर्व दातीर आणि नितीन डोईफोडे यांना मारहाण करत डोयाला गावठी कट्टा लावत पाच लाख रुपये आत्ताच्या आत्ता द्या नाहीतर तुम्हाला मारुन टाकेल अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वैभव चौधरी आणि वडील सुभाष चौधरी याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मात्र तरीही पोलिसांनी या दोघांना अटक केलेली नाही. यांना कोणात्या राजकीय नेत्याचावरदहस्त आहे. चौधरीकडे सावकारकी करण्याचा परवाना आहे का, या प्रकरणात एखाद्या विद्यार्थ्यांचा जीव गेला किंवा एखाद्यानं फाशी घेतली तर त्याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न पालकांसह ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.