अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
महानगरपालिकेच्या वतीने कर वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतले असून आयुक्त यशवंत डांगे यांनी 31 जानेवारीपर्यंत 100 टक्के शास्ती माफी जाहीर केली आहे.
त्या पार्श्वभूमीवर उपयुक्त वैशाहली शिंदे यांनी महापालिकेच्या मार्केट विभागाच्या वतीने सिद्धिबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील 01 ते 26 गाळेधारकांना भाडे भरण्याचे सांगितले. त्यानुसार सर्व गाळेधारकांनी 11 लाख 50 हजारांचा कर भरला. उपायुक्तांनी उर्वरित भाडे 31 मार्चपर्यंत भरण्याचे आदेश दिले.
नगरकरांनी शास्ती माफीचा लाभ घेऊन आपला कर भरावा व महापालिकेला सहकार्य करावे अन्यथा कर न भरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा उपायुक्त वैशाली शिंदे यांनी यावेळी दिला.सिद्धिबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सचे गाळे भाडे मार्केट विभागाच्या वतीने गाळेधारकांकडून 11 लाख 50 हजार रुपयाचा धनादेश उपायुक्त वैशाली शिंदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, मार्केट विभागप्रमुख सतीश पुंड, तुळशीराम जगधने, राम चाफे, बापू बेलेकर, आसाराम गुंड, शिवराम गवांदे, गाळेधारक उपस्थित होते.