spot_img
अहमदनगरशास्तीमध्ये जानेवारी अखेर १०० टक्के सवलत; आयुक्त यशवंत डांगे म्हणाले...

शास्तीमध्ये जानेवारी अखेर १०० टक्के सवलत; आयुक्त यशवंत डांगे म्हणाले…

spot_img

फेब्रुवारी अखेर शास्तीवर ७५ टक्के, २२ मार्च अखेर ५० टक्के सवलत मिळणार / महानगरपालिकेच्या सवलत योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी थकीत कराचा भरणा करावा : आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावर नियमानुसार शास्ती आकारली जात असल्याने नागरिकांच्या मालमत्ता करावरील थकबाकीचा बोजा वाढत आहे. महानगरपालिकेवरही आर्थिक ताण वाढत असून महानगरपालिकेच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ८ जानेवारी ते ३१ जानेवारी अखेरपर्यंत मालमत्ताधारकांना शास्तीमध्ये १०० टक्के सवलत मिळणार आहे. तसेच १ ते २८ फेब्रुवारी अखेरपर्यंत ७५ टक्के, तर १ ते २२ मार्च अखेर ५० टक्के सवलत दिली जाणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

महानगरपालिकेने कराच्या थकबाकी वसुलीसाठी जप्ती मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात येत आहेत. बहुतांश प्रकरणे लोक आदालतमध्ये घेऊन त्यात तडजोड करून मोठ्या प्रमाणात वसुली केलेली आहे. मागील तीन – चार वर्षात महानगरपालिकेने लोक अदालत च्या माध्यमातून सुमारे ३५ कोटी रुपयांची वसुली केली आहे. यंदा मार्च महिन्यामध्ये लोकअदालत होणार आहे. मात्र, तत्पूर्वी थकबाकीदारांना संधी देण्याच्या दृष्टीने व महानगरपालिकेची जास्तीत जास्त वसुली होण्यासाठी शास्तीमध्ये तीन टप्प्यात सवलत जाहीर करण्यात आली आहे.

मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील थकीत मालमत्ता कराचा भरणा ३१ जानेवारी अखेर केल्यास त्यांना शास्तीमध्ये १०० टक्के सवलत मिळणार आहे. त्यानंतर २८ फेब्रुवारी अखेरपर्यंत कर भरणाऱ्याना शास्तीमध्ये ७५ टक्के व १ ते २२ मार्च अखेर कर भरणाऱ्यांना शास्तीमध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व थकीत कराचा भरणा करावा. महानगरपालिका जप्ती कारवाई सुरू करणार असून कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी लवकरात लवकर कराचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोल्हापूर हादरलं! मामाने भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये केला भलताच कुटाणा; भयानक कारण समोर…

कोल्हापूर / नगर सह्याद्री - प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हटलं जातं....

नगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा; विजेत्यास चांदीची गदा, चारचाकी गाडी, आमदार जगताप म्हणाले…

29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान आयोजन | जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आ. संग्राम...

नगर-पुणे महामार्गावरअपघात; चालकासह आठ जण..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर- पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात एसटी बस ट्रेलरवर आदळून...

लाडकी बहिण योजनेवरून कोर्टाचे राज्य सरकारांना खडे बोल

दिल्ली | वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्यात 2024 विधानसभा निवडणुकीपूव लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली...