spot_img
अहमदनगर३० रस्‍त्‍यांकरीता १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर; मंत्री विखे पाटील...

३० रस्‍त्‍यांकरीता १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर; मंत्री विखे पाटील यांनी दिली मोठी माहिती, ‘या’ भागातील..

spot_img

लोणी । नगर सहयाद्री:-
जिल्‍हा परिषद परिषदेच्‍या ग्रामपंचायत विभागा अंतर्गत ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी देण्‍यात येणा-या विशेष अनुदान योजनेतून आश्‍वी महसूल मंडळातील विविध गावांमधील ३० रस्‍त्‍यांकरीता १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या माध्‍यमातून हा निधी मंजुर झाल्‍याने या तीस गावांमधील रस्‍त्‍यांची कामे आता मार्गी लागणार आहेत.

ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत निधी दिला जातो. या माध्‍यमातून गावातील पायाभूत सुविधांची कामे करता येतात. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात सदर अनुदान मंजुर व्‍हावे याकरीता प्रस्‍ताव सादर करण्‍यात आले होते. पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील याबाबत जिल्‍हा परिषदेच्‍या आधिका-यांना ग्रामीण भागातील रस्‍त्‍यांकरीता निधी तातडीने उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत सुचना दि‍ल्‍या होत्‍या. शिर्डी विधानसभा मतदार संघात समाविष्‍ठ असलेल्‍या संगमनेर तालुक्‍यातील ३० गावांकरीता १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्‍यात आला असून, या निधीस आता प्रशासकीय मान्‍यताही मिळाल्‍याने रस्‍त्‍यांची कामे होण्‍याचा मार्ग सुकर झाला आहे.

आश्‍वी आणि पंचक्रोशितील गावांना यापुर्वीही मंत्री विखे पाटील यांनी निधी मंजुर करुन दिला होता. या निधीतून गावातील रस्‍ते चांगल्‍या पध्‍दतीने तयार झाल्‍याने या गावांचे दळणवळण अधिक वाढले आहे. ग्रामीण भागातून येणारे रस्‍ते थेट मोठ्या रस्‍त्‍यांना जोडले गेल्‍याने या भागातील गावांचा थेट संपर्क आता मोठ्या गावांशी होवू लागला आहे. स्‍थानिक नागरीक, विद्यार्थी, व्‍यापारी, शेतकरी यांच्‍याकरीता रस्‍त्‍यांचे तयार झालेले जाळे महत्‍वपूर्ण ठरले आहे.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“काकाचं दर्शन घे, थोडक्यात वाचलास….”; अजित पवारांचा रोहित पवारांना टोला

मुंबई / नगर सह्याद्री - संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे....

मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग...

नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ...

पारनेरकरांना खुशखबर! मंत्री विखे पाटील म्हणाले, पुढील काळात..

आ. काशिनाथ दाते यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घेतली भेट पारनेर | नगर सह्याद्री पारनेर...