spot_img
महाराष्ट्र१ कोटी १० लाखांची फसवणूक; आयटी इंजिनियर सोबत असा घडला प्रकार..

१ कोटी १० लाखांची फसवणूक; आयटी इंजिनियर सोबत असा घडला प्रकार..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:
एसएमसी ग्लोबल सियुरिटीज ही मसेबीफकडे नोंदणीकृत कंपनी असल्याचे सांगत एका आयटी इंजिनियरला २० ते ३० टक्के नफ्याचे आमिष दाखवत मोबाईल अ‍ॅपवरून शेअर ट्रेडिंग करण्यास भाग पाडले. या माध्यमातून १ कोटी १० लाख ८० हजार रुपये जमा झाल्यावर त्याला अ‍ॅपवर व व्हॉट्स अ‍ॅपवर ब्लॉक करून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

५ ऑटोबर ते १५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ही घटना घडली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन व्हॉट्स अ‍ॅप नंबरधारक अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आयटी इंजिनियर प्रविण अंबादास राऊत (वय ४२, रा. राऊत मळा, कृष्णा मंदिरामागे, शेंडी, जि. अहिल्यानगर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी मोबाईल अ‍ॅपवर आलेल्या जहिरतीवरून एसएमसी ग्लोबल सियुरिटीज कंपनीशी संपर्क साधला.

त्यांनी सेबीकडे नोंदणीकृत संस्था असल्याचे कागदपत्र दाखवले. कंपनीच्या पवरून शेरे ट्रेडिंग केल्यास जादा नफा मिळेल, असे अमित दाखवून राऊत यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांनी महिनाभरात एकूण १ कोटी १० लाख ८० हजार रुपये कंपनीने दिलेल्या बँक खात्यावर जमा केले. पैसे परत मागितल्यावर त्यांना आधी कमिशनचे मागणी करण्यात आली . त्यानंतर ब्लॉक करून त्यांची फसवणूक करण्यात आली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...

नगरमध्ये चाललंय काय? दोन दिवसात ‘इतक्या’ अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या...

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पहा कुठे काय परस्थिती?

नाशिक । नगर सहयाद्री :- नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून...